PM Narendra Modi यांचा सिंधुदुर्ग दौरा; नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित

208
PM Narendra Modi यांचा सिंधुदुर्ग दौरा; नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग इथे ते पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे ‘नौदल दिन २०२३’ कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.

दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. सिंधुदूर्ग येथील ‘नौदल दिन २०२३’ हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध सागरी वारशाला आदरांजली अर्पण करत आहे. पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतचे पंतप्रधानांनी जलावतरण केले तेव्हा शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेत साकारण्यात आलेल्या नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा बिग बीं च्या आवाजातील व्हिडिओ शेअर)

दरवर्षी, नौदल दिनानिमित्त, भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते. (PM Narendra Modi)

१९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान कराची येथे भारतीय नौदलाच्या विजयाचे प्रतीक म्हणून ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. दिल्लीबाहेर नौदल दिनाच्या संचलनाचे आयोजन होण्याची ही दुसरी वेळ आहे आणि (PM Narendra Modi) पंतप्रधानांचे भाषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.