Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा बिग बीं च्या आवाजातील व्हिडिओ शेअर

भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ 'जलमेव यस्य, बलमेव तस्य' म्हणत नेव्ही  कडून जारी करण्यात आला आहे.

242
Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा बिग बीं च्या आवाजातील व्हिडिओ शेअर
Indian Navy Day 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा बिग बीं च्या आवाजातील व्हिडिओ शेअर

छत्रपती शिवरायांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. त्याकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारलं. सागरी सुरक्षेला महत्त्व दिलं. याची आठवण म्हणून नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाने छत्रपती शिवरायांना ट्रिब्युट देणार खास व्हिडीओ शेअर केला आहे.नौदल दिनाचा (४ डिसेंबर) देशाचा मुख्य भव्य कार्यक्रम सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली समुद्रकिनारी होणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज घुमणार आहे. शिवछत्रपतीमय वातावरणात शिवरायांना नमन करीत नौदलाचा इतिहास अमिताभ मांडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. (Indian Navy Day 2023)

(हेही वाचा :Indian Navy day : इंडियन नेव्ही डे)

भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ म्हणत नेव्ही  कडून जारी करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपतींच्या दूरदृष्टीचा दाखला देण्यात आला आहे. शिवरायांनी स्वराज्य परकीय आक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जसं आरमार उभारलं होतं तशीच आता देशाच्या सुरक्षेसाठी नौसेनेचे जवान सज्ज असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Indian Navy Day 2023)

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर नेव्ही डे 2023 साजरा केला जाणार आहे. या व्हिडीओसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”भारतीय नौसेनेच्या पराक्रमाचा आणि अष्टपैलुत्वाचा साक्षीदार व्हा, कारण ते “जलमेव यस्य, बलमेव तस्य” या प्राचीन मंत्राचे उदाहरण देते, जे भारताच्या समृद्धी आणि कल्याणासाठी आमच्या अदम्य नौसेना सामर्थ्याचे महत्त्वपूर्ण प्रासंगिकतेचे प्रदर्शन करत आहे. (Indian Navy Day 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.