Surat Diamond Bourse : पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त ‘सूरत डायमंड बोर्स’, PM मोदींच्या हस्ते उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ( १६ डिसेंबर) जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब ' सूरत डायमंड बोर्स' चे उद्घाटन करणार आहेत.

211
Surat Diamond Bourse : पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त 'सूरत डायमंड बोर्स', PM मोदींच्या हस्ते उदघाटन
Surat Diamond Bourse : पेंटागॉन पेक्षाही जबरदस्त 'सूरत डायमंड बोर्स', PM मोदींच्या हस्ते उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ( १६ डिसेंबर) जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब ‘ सूरत डायमंड बोर्स’ चे उद्घाटन करणार आहेत. ३४०० कोटी रुपये खर्च करून ३५.५४ एकर जमिनिवर बांधलेले सूरत डायमंड बोर्स खडबडीत आणि पॉलिश्ड हिऱ्यांच्या व्यापारासाठी जागतिक केंद्र बनणार आहे. (Surat Diamond Bourse )

डायमंड बोर्स ही जगातील सर्वात मोठी इंटरकनेक्टड इमारत आहे. कारण या इमारतीमध्ये ४५०० हून अधिक इंटरकनेक्टेड कार्यालये आहेत. कार्यालयाची इमारत पेंटागॉनपेक्षा मोठी आहे आणि देशातील सर्वात मोठे कस्टम क्लिअरन्स हाऊस आहे. या इमारतीत १७५ देशांतील ४२०० व्यापारी सामावून घेण्याची क्षमता आहे ,जे पॉलिश्ड हिरे खरेदी करण्यासाठी सुरतमध्ये येतील. या व्यापार सुविधेमुळे अंदाजे १.५ लाख लोकांना रोजगार मिळेल. तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातील हिरे खरेदीदाराना सुरतमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागतिक व्यासपीठ मिळेल. (Surat Diamond Bourse )

(हेही वाचा : Hardik Replaces Rohit : हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यावर मुंबई इंडियन्सनी रोहीत शर्माला काय संदेश दिला?)

सुरत डायमंड बोर्सचे माध्यम समन्वक दिनेश नावडिया यांनी एका निवेदनात सांगितले की, उदघाटनापूर्वी मुंबईतील अनेक हिरे व्यापाऱ्यांनी आपल्या कार्यालयांचा ताबा घेतला आहे. या व्यापारांना लिलावानंतर व्यवस्थापनाने हे वाटप केले होते. तसेच सूरत डायमंड बोर्स च्या उदघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी आयोजित सभेला संबोधित करतील असेही नावाडिया यांनी सांगितले.

(हेही वाचा :Mysore Airport Renamed : विमानतळाला टीपू सुलतानाचे नाव देण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावावरून भाजप आक्रमक)

 
दरम्यान, याआधी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘एक्स’ वर म्हटले होते की, सूरत डायमंड बोर्सने आता पेंटागॉनला मागे टाकून गेल्या ८० वर्षांपासून जगातील सर्वात मोठी कार्यालय इमारत बनवली आहे. तसेच सुरत डायमंड बोर्स सूरतच्या हिरे उद्योगाची गतिशीलता आणि वाढ दर्शवते. हा देखल भारताच्या उद्योगजतेचा पुरावा आहे. याशिवाय आपलय अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल असेही म्हटले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.