मुंबईतील सदनिकेत डांबून ठेवलेल्या दोन लहान माकडांची PETA कडून सुटका

82

मुंबईत एका सदनिकेत दोन लहान माकडे आणि पॅराकीट्सना डांबून बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी एका सुज्ञ नागरिकाच्या तक्रारीवरून पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (PETA) इंडिया या संस्थेने या दोन माकडांचा आणि तीन पॅराकीट्स यांची सुखरूप सुटका केली. या दोन्ही प्रजातींना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अंतर्गत संरक्षण देण्यात आलेले आहे. त्यांना वाचवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, मुंबई आणि ठाणे वनविभाग यांनी संयुक्तपणे त्यांची सुटका केली. त्यांच्या पुनर्वसनाआधी या जनावरांना सध्या ठाणे वनविभागाच्या दवाखान्यात उपचार दिले जात आहेत.

माकडांना किंवा पॅराकीट्सना पकडणे, खरेदी करणे, विकणे किंवा पिंजऱ्यात ठेवणे बेकायदेशीर आहे. असे करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किंवा 25,000 रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो किंवा दोन्ही शिक्षा केल्या जाऊ शकतात. अवैध पक्ष्यांचा व्यापार करत असताना, असंख्य पक्षी त्यांच्या कुटुंबापासून दूर जातात आणि त्यावेळी त्यांना खाद्य दिले जात नाही. नुकतेच पंख फुटलेल्या पक्ष्यांना त्यांच्या घरट्यांमधून ओढून नेले जाते, त्यावेळी काही पक्षी स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करीत असताना त्यांना गंभीर पद्धतीने इजा होते किंवा काही मरू शकतात, काही पक्षी सापळ्यात किंवा जाळ्यात अडकल्याने घाबरून जातात. पकडलेल्या पक्ष्यांना लहान बॉक्समध्ये पॅक करून ठेवले जाते आणि त्यापैकी अंदाजे 60% पक्षी निव्वळ भीतीमुळे ने-आण करताना मरतात. जिवंत राहिलेल्या पक्ष्यांना कैदेत ठेवले जाते. त्यांना एकाकी जीवन जगावे लागते. ज्यामुळे ते कुपोषित राहतात, एकटे जगतात, नैराश्य आणि तणाव त्यांना भेडसावतात. दरम्यान, माकडांना प्रशिक्षण देताना मारहाण केली जाते, अन्न दिले जात नाही, तसेच त्यांच्यापासून इजा होऊ नये म्हणून त्यांचे दात बाहेर ओढून काढले जातात. त्यामुळे 1998 मध्ये केंद्र सरकारने प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये एक अधिसूचना जारी केली होती, असे PETA चे म्हटले आहे.

(हेही वाचा इंदूरमध्ये मोठी दुर्घटना; रामनवमीचा उत्सव सुरू असताना मंदिरातील विहिरीचे छत कोसळले, २५ भाविक अडकल्याची भीती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.