Paytm Crisis : अखेर विजय शेखर यांचा पेटीएम पेमेंट्‌स बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळात ४ नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

112
Paytm Crisis : अखेर विजय शेखर यांचा पेटीएम पेमेंट्‌स बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
  • ऋजुता लुकतुके

पेटीएम पेमेंट्स बँकेचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून विजय शेखर (Vijay Shekhar) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यानंतर संचालक मंडळात ४ नवीन सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. आणि नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं कंपनीकडून शेअर बाजार नियामक मंडळाला सोमवारी उशिरा कळवण्यात आलं आहे. (Paytm Crisis)

रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेवर केलेल्या कारवाईनंतर शेखर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. येत्या १५ मार्चपासून पेमेंट्स बँकेला नवीन ठेवी, मुदतठेवी तसंच वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये नवीन ठेवी स्वीकारण्यावर रिझर्व्ह बँकेनं बंदी घातली आहे. पेमेंट्स बँकेवर निर्बंध आहेतच शिवाय रिझर्व्ह बँकेनं नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशनलाही थर्ड पार्टी परवाना देण्यापूर्वी विशेष लक्ष घालण्यास सांगितलं आहे. त्यामुळे पेटीएम कंपनीवरच चहूबाजूंनी संकटं आली आहेत. (Paytm Crisis)

(हेही वाचा – Actor Randeep Hooda: अभिनेता रणजित हुड्डाने अंदमान तुरुंगात काढलेली छायाचित्रे वीर सावरकर यांच्या आत्मात्मार्पणदिनानिमित्त सोशल मिडियावर केली शेअर, लिहिली ‘ही’ पोस्ट; वाचा सविस्तर…)

युपीआय ॲपही धोक्यात

त्यातच कंपनीतील मोठ्या गुंतवणूकदारांनी अलीकडे खास बैठक घेऊन त्यात विजय शेखर (Vijay Shekhar) यांनी राजीनामा द्यावा अशी गागणी केली होती. त्यामुळे विजय शेखर (Vijay Shekhar) यांच्यावरील दबाव वाढला होता. पेमेंट्स बँकेचा परवाना धोक्यात आल्यामुळे पेटीएम हे देशातील तिसऱ्या क्रमांकावरील युपीआय ॲपही धोक्यात आलं आहे. कारण, युपीआयचे व्यवहारही पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून होतात. त्यामुळे आता पेटीएमचं युपीआय ॲपही एचडीएफसी, ॲक्सिस, स्टेट बँक आणि येस बँक अशा बँकांबरोबर युपीआय ॲप सुरू रहावं यासाठी करार करण्याच्या प्रयत्नांत आहे. (Paytm Crisis)

पण, या बँकांनीही पेटीएम कंपनीबरोबरचा कुठलाही करार किंवा व्यवहार हा रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्त्व तपासूनच केला जाईल अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे संकटांनी घेरलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता गमावलेल्या विजय शेखर (Vijay Shekhar) यांनी राजीनामा देण्यावाचून पर्याय उरला नाही. (Paytm Crisis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.