Lok Sabha Election 2024 : बंगालच्या या २२ जागांवर भाजपाचं विशेष लक्ष

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शहा यांनी बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती आहे.

108
Lok Sabha Election 2024 : बंगालच्या या २२ जागांवर भाजपाचं विशेष लक्ष
Lok Sabha Election 2024 : बंगालच्या या २२ जागांवर भाजपाचं विशेष लक्ष

बंगालमध्ये गमावलेल्या लोकसभेच्या २२ जागांवर भारतीय जनता पक्ष (BJP) विशेष लक्ष देणार आहे. या सर्व जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. काही जागांवर भाजपा आणि तृणमूल यांच्यात चुरशीची लढत होती. तिथे भाजपाचा फार कमी मतांनी पराभव झाला. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शहा यांनी बंगालमध्ये एकूण ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती आहे.

त्या २२ लोकसभा जागांवर विशेष लक्ष

यावेळी भाजपा बंगालच्या त्या २२ लोकसभा जागांवर विशेष लक्ष देईल, जिथे ते २०१९ च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बंगालमध्ये भाजपाने ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या, तर २२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होता.

या सर्व जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या होत्या. काही जागांवर भाजपा आणि तृणमूल यांच्यात निकराची लढत होती. तेथे भाजपाचा फार कमी मतांनी पराभव झाला. यावेळी भाजपाने ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जे साध्य करण्यासाठी बंगालमध्ये आघाडी मिळवणे आवश्यक आहे, त्यामुळे २०१९ मध्ये गमावलेल्या जागा जिंकण्यासाठी भाजपा (BJP) कोणतीही कसर सोडणार नाही.

गमावलेल्या ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य

यावेळी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शहा यांनी बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण ३५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असल्याची माहिती आहे.

(हेही वाचा – Tanaji Sawant : हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा)

अनेक नवीन चेहऱ्यांना उमेदवारी

भाजपाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष यावेळी बंगालमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देऊ शकतो. तृणमूलप्रमाणे बंगाली चित्रपटसृष्टीतील (टॉलिवूड) अनेक कलाकारांना तिकीट दिले जाऊ शकते.

बंगालमधील निवडणूक प्रचारासाठी खास रणनीती 

२०२१ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीतही भाजपाने अनेक टॉलिवूड कलाकारांना उमेदवारी दिली होती. प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा (BJP) नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र मिथुन यांनी नुकताच याला पूर्णविराम देत निवडणूक लढवणार नसून पक्षाचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले होते. १ मार्चपासूनच प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. बंगालमधील निवडणूक प्रचारासाठी विशेष रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाच्या स्टार प्रचारकांना येथे अधिक वेळ देण्यास सांगितले जाऊ शकते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.