Mumbai Air Port : मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्या वाढली

गेल्यावर्षी मुंबई विमातळावरून झालेल्या विमान वाहतुकीमध्ये देखील २०२२ च्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

105
Mumbai Air Port : मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्या वाढली

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) २०२३ मध्ये हवाई प्रवाशांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढून ५१.५८ दशलक्ष झाली आहे.(Mumbai Air Port )

मुंबई विमानतळ प्रशासनाने तब्बल ५ कोटी १५ लाख ८० हजार प्रवासी संख्या हाताळल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. हा आजवरचा विक्रम ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी मुंबई विमातळावरून झालेल्या विमान वाहतुकीमध्ये देखील २०२२ च्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण ३ लाख ३४ हजार ३९१ विमानांची वाहतूक मुंबई विमानतळावरून झाली आहे.(Mumbai Air Port )

(हेही वाचा : Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नवी मुंबईत, अवजड वाहनांना प्रवेशबंदी)

विमानतळ संचालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (MIAL) एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीपूर्व पातळीच्या  तुलनेत एकूण वाहतुकीची वाढ ११० टक्के होती.भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी २०२३ हे वर्ष लाभदायी ठरले आहे. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतर प्रवासी वाहतूक पाहता गेल्या वर्षी प्रवासीसंख्या वाढली आहे. गेल्या वर्षी पाहिल्या गेलेल्या ५१. ५८दशलक्ष प्रवाशांपैकी २५.४ दशलक्षाहून अधिक प्रवासी आले आणि २६.१ दशलक्ष प्रवाशांनी विमानतळावरून प्रस्थान केले. देशांतर्गत प्रवासात दिल्‍ली, बेंगळूर आणि चेन्‍नई ही ठिकाणे; तर आंतरराष्‍ट्रीय प्रवासात दुबई, लंडन आणि अबुधाबी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे ठरली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.