Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नवी मुंबईत, अवजड वाहनांना प्रवेशबंदी

168
Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नवी मुंबईत, अवजड वाहनांना प्रवेशबंदी
Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे-पाटील गुरुवारी नवी मुंबईत, अवजड वाहनांना प्रवेशबंदी

मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेले मराठा आरक्षण पायी दिंडीचा मुक्काम २५ जानेवारीला नवी मुंबईत होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने त्यांची व्यवस्था केली जात आहे.

नवी मुंबईतील बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजार आवारात मार्चाचा मुक्काम असणार आहे. महिलांची राहण्याची व्यवस्था सिडको प्रदर्शन केंद्रात करण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबईतील समन्वयकांनी दिली आहे.

(हेही वाचा – Manoj Jarange-Patil: मनोज जरांगेंच्या पुण्यातील सभेला लाखोंचा जनसमुदाय, पदयात्रा मुंबईच्या दिशेने रवाना)

२६ जानेवारी रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाखोंच्या संख्येने तिरंगा फडकवून हा मोर्चा पुढे मुंबईत जाणार आहे. त्यांच्या राहण्या-खाण्याची तसेच पाण्याची, शौचालयांची व्यवस्था करण्याबाबत महापालिका, सिडको, पोलिस तसेच एपीएमसी प्रशासन यांच्याशी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने पत्रव्यवहार केला आहे.

बाजार आवार बंद?
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाजार आवारातील कामकाज गुरुवार, २५ जानेवारीला बंद ठेवले जाणार आहे. बाजार घटकांकडून याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

वाहनांना प्रवेशबंदी
नवी मुंबई २५ जानेवारीला रात्री १२ ते २६ जानेवारी रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्यास, वाहने उभी करण्यास, शहरातील सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.