Paneer: बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर १ मेपासून कारवाई, नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन

112
Paneer: बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर १ मेपासून कारवाई, नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
Paneer: बनावट पनीर विक्री करणाऱ्यांवर १ मेपासून कारवाई, नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन

Paneer: प्रथिने आणि कॅल्शियमचा  उत्तम स्रोत असलेल्या आरोग्यदायी पनीरबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काही उपहारगृहात हे पनीर वनस्पती तेल, स्टार्च आणि दुधाची भुकटी वापरून बनावट अर्थात ‘आर्टिफिशियल पनीर’ वापरून खाद्यपदार्थ तयार केले जातात. अशा ‘आर्टिफिशियल पनीर’ (Artificial cheese) म्हणजेच चीज अॅनलॉगवर केंद्र सरकारने ‘फूड सेफ्टी अँण्ड स्टँण्डर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाच्या’ (FSSAI) नियमांनुसार, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्वस्त पनीर आणि बनावट पनीरची विक्री करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. १ मेपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

पनीर म्हणून चीज अनॅलॉग अर्थात आर्टिफिशियल पनीर विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) आदेशानंतर केंद्र शासनाकडून देखील अंमलबजावणीचे आदेश दिले. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ही माहिती दिली. देशातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स, फास्ट फूड चालकांना केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले. ‘एफएसएसएआय’कडून (FSSAI) कारवाईसाठी परिपत्रक जारी करण्यात आले.

हेही वाचा – Iran Tensions : डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मूझवर संपूर्ण नियंत्रणाचा दावा किती खरा?

नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन…
विधीमंडळ अधिवेशनात विक्रमसिंह पाचपुते यांनी आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मांडला होता. १ मेपासून पनीरऐवजी चीज अॅनलॉग म्हणून मेन्यू कार्डमध्ये बदल करावा लागणार आहे. मेन्यू कार्डमध्ये बदल न केल्यास एफडीए आणि एफएसएसएआयकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनादेखील पनीर खाताना ते बनावट चवीचे लागले तर त्यांना तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खरे आणि बनावट पनीर कसे ओळखाल?
– खरे पनीर फक्त दुधापासून बनवले जाते. चीज अनॅलॉगमध्ये पाम तेल, स्टार्च आणि दुधाचे घन पदार्थ वापरले जातात.
– पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन आणि कॅल्शियम असते.
– चीज अनॅलॉगमध्ये प्रथिने कमी आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात.
– खरे पनीर मऊ आणि सहज तुटणारे असते.
– चीज अनॅलॉग रबरासारखे, चिवट आणि थोडे तेलकट असते.
– चीज अनॅलॉग हे खऱ्या पनीरच्या तुलनेत खूप स्वस्त असते.
– चीज अनॅलॉग १५० ते २१० रुपये किलो दराने मिळते. तर पनीरचा दर ३५० ते ४०० रुपये किलो आहे.
– वनस्पती तेल आणि दूध किंवा दुधाची भुकटी एकत्र करून तयार होणाऱ्या चीज अॅनालॉगचा पनीर म्हणून आहारात समावेश केला जातो.
– चीज अनॅलॉग खाल्ल्याने मेद वाढणे, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासह पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात.
– पनीरऐवजी पर्यायी पदार्थ म्हणून चीज अनॅलॉग वापरणे ही एका अर्थाने ग्राहकांची फसणवूक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.