Kalyan : एक कविता तळ्याकाठी…; सार्वजनिक वाचनालयाचा दिलखेचक उपक्रम

कल्याण-डोंबिवलीकर वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

64
कार्यक्रमात पुस्तक प्रदर्शन आणि वाचनालयाचे उद्घाटन.
Kalyan : एक कविता तळ्याकाठी...; सार्वजनिक वाचनालयाचा दिलखेचक उपक्रम
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan              कल्याणातील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी पुस्तक प्रदर्शनासह तात्काळ सभासद योजना व एक कविता तळ्याकाठी या कार्यक्रमाचे कल्याण पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे सरोवर या ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले होते. आगळ्यावेगळ्या अशा या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवलीकर वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तात्काळ सभासद योजनेचा लाभ साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर घेतला. प्रसंगी वाचनालयाचे ॲड. सुरेश पटवर्धन, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, बाळकृष्ण धुरी, प्रगती महाविद्यालयाच्या प्रा. मालती पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, वाचक, साहित्यप्रेमी, ग्रंथसेविका, आदी उपस्थित होते. (Kalyan)

(हेही वाचा – खासदारकी धोक्यात येण्याच्या भीतीने संजय राऊतांचीच ‘मातोश्री’वर फिल्डिंग? BJP चा खळबळजनक दावा)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते पुस्तकगुढीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उदेशाने सदर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून तत्काळ सभासद योजनेत जास्तीत जास्त वाचकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी यावेळी बोलताना केले. वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी डिजिटल युगात ई-बुक्स व ऑडीओ-बुक्स उपलब्ध असले तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाचा असतो असे मत व्यक्त केले. (Kalyan)

(हेही वाचा – US Iran Ceasefire : इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची असीम मुनीर यांच्याशी फोनवर चर्चा; इतर देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न)

सिने-नाट्य कलावंतांची उपस्थिती

कल्याण पश्चिमेकडील प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या ठिकाणी विविध प्रकारचे ग्रंथ एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळाल्याचा आनंद प्रात:काळी फेरफटका मारण्याकरिता येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केला. वाचनालयाच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने सदर पुस्तक प्रदर्शनामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळेल, असे मत वाचनालयाच्या वाचक सभासदांनी मांडले. एक कविता तळ्याकाठी, या उपक्रमांतर्गत तळ्याकाठच्या शांततेचा व निसर्गाच्या सौदर्याचा अनुभव घेत कवी मकरंद वांगणेकर, सुधाकर कांबळी, सिने व नाट्य अभिनेता सुधाकर वसईकर, रंगकर्मी सुधीर चित्ते, स्वाती नातू, जया पाटील, संयुक्ता राठोड, मंगला कांकणे, सुरेखा गावंडे, आदी अनेक रसिक मान्यवर कवींनी स्वकविता सादर केल्या. (Kalyan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.