-
प्रतिनिधी
BJP विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच निर्माण झालेला असतानाच, आता भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. “उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी खुद्द संजय राऊतच पडद्यामागून हालचाली करत आहेत,” असा खळबळजनक दावा बन यांनी शुक्रवारी भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत केला. उद्धव ठाकरे आमदार झाले तर वर्षभरानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत स्वतःचा पत्ता कट होईल, या भीतीपोटी राऊतांनी ही ‘फिल्डिंग’ लावल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. (BJP)
(हेही वाचा – Iran Tensions : डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मूझवर संपूर्ण नियंत्रणाचा दावा किती खरा?)
नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवताना त्यांना ‘काँग्रेस रत्न’ पुरस्कार देण्याची उपरोधिक मागणीही केली. “राहुल गांधी जेवढी काँग्रेसची बाजू मांडत नाहीत, त्यापेक्षा जास्त चाकरी राऊत करत आहेत. मीठ ठाकरेंचं खायचं आणि चाकरी काँग्रेसची करायची, हाच त्यांचा धंदा झाला आहे,” अशा तिखट शब्दांत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीत सध्या एकमेकांचे पाय खेचण्याचे काम सुरू असून, विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसने राज्यसभेची अट घालून ठाकरेंची कोंडी केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. (BJP)
(हेही वाचा – Trump on Tennis : ‘हा आहे सगळ्यात चांगला टेनिसपटू,’ असं म्हणत ट्रम्प यांनी जेव्हा दक्षिणेश्वरचं कौतुक केलं)
यावेळी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना बन यांनी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करत राऊतांना पेचात पकडले. “भाजपाने महिला पंतप्रधान का दिली नाही, असे विचारण्यापूर्वी २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी रश्मी वहिनींना मुख्यमंत्री का केले नाही? आता तरी आदित्य ठाकरेंऐवजी रश्मी ठाकरेंचे नाव पक्षप्रमुख म्हणून जाहीर करण्याचा आग्रह राऊत धरणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच स्वप्ना पाटकर यांना मिळणाऱ्या धमक्यांचा उल्लेख करत, “देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कुठल्याही बहिणीला घाबरण्याची गरज नाही, धमक्या देणाऱ्यांची टोळी वेळीच ठेचली जाईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आता भाजपाच्या या आरोपांवर शिवसेना उबाठा काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

