Operation Jeevan Rekha : रेल्वे सुरक्षा दलाने वाचवली ‘इतक्या’ जणांची जीवनरेखा

सप्टेंबर 2023 मध्ये मानवी तस्करांच्या तावडीतून 29 जणांची सुटका करण्यात आली, आणि 14 मानवी तस्करांना अटक करण्यात आली, तर फलाटावरील 265 प्रवाशांचे प्राण वाचवले.

128
Operation Jeevan Rekha : रेल्वे सुरक्षा दलाने वाचवली 'इतक्या' जणांची जीवनरेखा
Operation Jeevan Rekha : रेल्वे सुरक्षा दलाने वाचवली 'इतक्या' जणांची जीवनरेखा

रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सदैव सज्ज असते. (Operation Jeevan Rekha) प्रवाशांना सुरक्षित, निर्भय आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी दल चोवीस तास कार्यरत असते. याशिवाय भारतीय रेल्वेला एक सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी हे दल सहाय्य करते. आरपीएफने नेहमीच प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करून आणि रेल्वेच्या मालमत्तेशी झालेल्या गुन्ह्यांचा वेळोवेळी छडा लावण्याचा प्रयत्न करून देशभरात विखुरलेल्या रेल्वेच्या प्रचंड मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी नेहमीच अगदी चोखपणे पार पाडली आहे. सप्टेंबर 2023 मध्येही रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) केलेली कामगिरी लक्षणीय कामगिरी केली आहे. (Operation Jeevan Rekha)

‘नन्हे फरीश्ते’ अंतर्गत लहान मुलांची सुटका

विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या/हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यामध्ये आरपीएफ महत्वाची भूमिका बजावते. या अनुषंगाने भारतीय रेल्वेने ‘नन्हे फारीश्ते’ ही मोहीम सुरु केली आणि या मोहिमे अंतर्गत, सप्टेंबर-2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या संपर्कात आलेल्या काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 895 पेक्षा जास्त मुलांची (मुलगे-573 आणि मुली-322) सुटका करण्यात आली, आणि त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये परत पाठवण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. (Operation Jeevan Rekha)

मानवी तस्करी आणि ऑपरेशन आहट (AAHT)

मानवी तस्करांच्या कुटील कारस्थानांचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी, आरपीएफची मानवी तस्करी विरोधी पथके भारतीय रेल्वेमध्ये पोस्ट स्तरावर (ठाणे स्तरावर) कार्यरत आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये मानवी तस्करांच्या तावडीतून 29 जणांची सुटका करण्यात आली, आणि 14 मानवी तस्करांना अटक करण्यात आली. (Operation Jeevan Rekha)

ऑपरेशन ‘जीवनरक्षा’

ऑपरेशन ‘जीवनरक्षा’ अंतर्गत सप्टेंबर 2023 मध्ये रेल्वे मार्ग आणि फलाटावरील 265 प्रवाशांचे प्राण आरपीएफ पथकांची सतर्कता आणि त्यांनी केलेल्या त्वरीत कारवाईमुळे वाचले.

महिलांची सुरक्षितता

भारतीय रेल्वे महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात, “मेरी सहेली” हा उपक्रम लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांना, विशेषत: एकट्याने प्रवास करणाऱ्या किंवा असुरक्षित महिला प्रवाशांना गुन्हेगारीपासून संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत, 231 मेरी सहेली पथकांनी 13071 रेल्वे गाड्यांमध्ये हजेरी लावली आणि सप्टेंबर 2023 मध्ये 421198 महिला प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली.

त्याशिवाय आरपीएफने सप्टेंबर 2023 मध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या 6033 व्यक्ती विरोधात कारवाई केली. (Operation Jeevan Rekha)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.