OnePlus 12 Series Launch : वन प्लस १२ सीरिजमधील फोनची किंमत, वैशिष्ट्ये आणि बॅटरीचं आयुष्य याविषयी जाणून घेऊया

वन प्लस १२ सीरिज भारतात आज लाँच होत आहे. चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी हा फोन लीक झाला होता, तेव्हा या फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. भारतात या फोनची विक्री ३० जानेवारीपासून सुरू होईल.

334
OnePlus 12 Series Launch : वन प्लस १२ सीरिजमधील फोनची किंमत, वैशिष्ट्ये आणि बॅटरीचं आयुष्य याविषयी जाणून घेऊया

ऋजुता लुकतुके

वन प्लस १२ (OnePlus 12 Series Launch) आणि वन प्लस १२ आर हे दोन बहुचर्चित फोन आज (मंगळवार २३ जानेवारी) भारतात लाँच होत आहेत. चीनमध्ये काही दिवसांपूर्वी या फोनबद्दल विबो या तिथल्या सोशल मीडियावर लिहून आलं होतं. त्यामुळे हा फोन नेमका कसा आहे आणि त्याची किंमत काय याचा नेमका अंदाज बांधता येऊ शकतो. वन प्लस १२ हा प्राथमिक फोन १२ जीबी रॅमचा असेल. त्याची किंमत ही ६४,९९९ रुपये इतकी असेल. तर १६ जीबी रॅमचा वन प्लस १२ आर हा फोन ६९,९९९ रुपयांना मिळेल. भारतात या फोनची विक्री ३० जानेवारीपासून सुरू होईल.

(हेही वाचा – Babri slogans at Jamia Millia : राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना होत असतांना जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात बाबरीसाठी घोषणा)

५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी – 

स्नॅपड्रॅगन ८ प्रणालीवर आधारित या फोनचं खास वैशिष्ट्य असेल ती ५,००० एमएएच क्षमतेची बॅटरी. तर १०० डब्ल्यू क्षमतेचा चार्जरही जलद चार्जिंगसाठी उपयुक्त आहे. वन प्लस १२ सीरिज चिनी बाजारपेठेत यापूर्वीच आला आहे. त्यामुळे फोनविषयी इतर माहितीही आता उपलब्ध आहे. (OnePlus 12 Series Launch) फोनचा डिस्प्ले ६.८२ इंचांचा असेल. तर रिफ्रेश रेट १२०० हर्ट्झचा असेल. हा फोन अत्यंत स्पष्ट चित्रासाठी ओळखला जाईल.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : थंडीच्या कडाक्यातही रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी)

२५६ जीबी स्टोरेज – 

या फोनची स्टोरेज क्षमता २५६ जीबी (OnePlus 12 Series Launch) आणि ५१२ जीबी इतकी असेल. या फोनचा प्राथमिक कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा असेल. तर टेलिफोटो लेन्स ६४ मेगापिक्सेलची आणि अल्ट्रावाईड लेन्स ४८ मेगापिक्सेलची आहे. तर 2x ऑप्टिकल झूमची सोय यात आहे. वन प्लस १२ सीरिज बरोबरच कंपनीने जागतिक स्तरावर इयरबड्सही लाँच करण्याचं ठरवलं आहे.

(हेही वाचा – Subhash Chandra Bose : ’तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ ही अजरामर घोषणा देणारे सुभाषचंद्र बोस)

हे इयरबड्स एकदा चार्ज केल्यावर ४४ तास चालतील. ब्लूटूथ कम्पॅटेबिलिटी ५.३ इतकी आहे. या इयरबड्समधील आवाजाचा दर्जा अत्युत्तम असेल असा कंपनीचा दावा आहे. (OnePlus 12 Series Launch)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.