Tata Marathon 2024 : मुंबई मॅरेथॉन २,२०० पदकांची चोरी, ६ जणांना अटक

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (२१ जानेवारी) झालेल्या या स्पर्धेत जवळपास ५० हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

163
Tata Marathon 2024 : मुंबई मॅरेथॉन २,२०० पदकांची चोरी, ६ जणांना अटक

मुंबईत रविवारी (२१ जानेवारी) झालेल्या टाटा मॅरेथॉन (Tata Marathon 2024) मधील मॅरेथॉन पदके चोरणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या सहा जणांकडून पोलिसांनी तब्बल २,२०० पदके जप्त केली आहेत. सोन्याचे पदके असल्याच्या गैरसमजुतीमधून या सहा जणांनी ही पदके चोरली होती अशी माहिती समोर येत आहे. आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

(हेही वाचा – Kerala CM On Ram Mandir : केरळच्या मु्ख्यमंत्र्यांना राममंदिराचा पोटशूळ; म्हणे, धर्म आणि सरकार यांच्यातील रेषा पुसट होत आहे)

चोरीचा गुन्हा दाखल –

सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मुंबईत टाटा मॅरेथॉन (Tata Marathon 2024) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (२१ जानेवारी) झालेल्या या स्पर्धेत जवळपास ५० हजार पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला मॅरेथॉन पदके देण्यात येतात. मात्र यंदा अनेक स्पर्धकांना पदके मिळाली नाही. ही पदके कमी पडल्यामुळे त्यांना पदके देण्यात आलेली नव्हती. बॉम्बे जिमखाना येथे ठेवण्यात (Tata Marathon 2024) आलेली जवळपास २ हजार २०० पदकांची चोरी झाल्याचे लक्षात येताच आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – Delhi Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, अनेक जण अडकल्याची भीती)

आझाद मैदान पोलिसांनी केली कारवाई – 

आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. (Tata Marathon 2024) त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तंबू बांधणारे मजूर यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीतून विघ्नेश पांडे तेवर (२०), नासिर अब्दुल शेख (२४), पिरमल बालन, गौतम गणेश सोलंकी (२४), रोहित विजयसिंग (२३) आणि अमीर रफिक शेख (२६) या सहा जणांची नावे समोर आली. पोलिसांनी या सहा जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची (Tata Marathon 2024) कबुली दिली.

(हेही वाचा – Ayodhya Shri Ram Mandir : थंडीच्या कडाक्यातही रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी)

६२० पदके जप्त –

पोलिसांनी या सहा जणांकडून १.३८ लाख रुपये किंमतीचे ६२० पदके जप्त करण्यात आली आहेत. चोरण्यात आलेली ही पदके सोन्याची आहेत असे समजून या सहा जणांनी पदके ठेवण्यात आलेले १६२ बॉक्स चोरी केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Tata Marathon 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.