PM Narendra Modi : तरुणांच्या हातात देशाचे भविष्य

पीएम मोदी म्हणाले- ज्याप्रमाणे १९४७ च्या २५ वर्षाआधी देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी तरुणांवर होती. त्याचप्रमाणे, २०४७ पर्यंत म्हणजेच पुढील २५ वर्षांत भारताला विकसित देश बनवण्याची जबाबदारी तुमची आहे. आजच्या भारतात तुमचे नाव सुवर्णाक्षरात कसे लिहिले जावे हे तुम्हीच ठरवायचे आहे.

151
Modi Govt च्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी घोडदौड; विश्वास पाठक यांचे प्रतिपादन

देशाचा सुवर्ण इतिहास घडवायचा असेल तर तरुण पिढीने जबाबदारीने वागायला हवं. शिवाय युवा पिढीच देशाला योग्य मार्गावर नेऊ शकते. कारण तरुणांच्या हातात देशाचे उज्वल भविष्य असल्याचे स्पष्ट मत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी (२५ जानेवारी) व्यक्त केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त (National Voter’s Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रथम मतदान करणाऱ्या मतदारांना व्हर्चुअली संबोधित केले. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की – देशाचा विकास आणि तुमचे एक मत, दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. तुमचे एक मत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. (PM Narendra Modi)

तुमचे एक मत भारतात स्थिर आणि मोठ्या बहुमताचे सरकार आणेल. तुमचे एक मत डिजिटल क्रांतीला अधिक ऊर्जा देईल. तुमचे एक मत भारताला स्वबळावर अवकाशात घेऊन जाईल. तुमच्या एका मताने भारतातील पहिले प्रवासी विमान बनवेल. तुमचे एक मत भारताची विश्‍वासार्हता वाढवेल. पुढच्या २५ वर्षांत तुम्हाला स्वतःचे आणि देशाचे भविष्य ठरवायचे आहे. स्थानिक, जिल्हा, राज्य आणि केंद्र पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुमची जबाबदारी मोठी असेल. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Sanjay Raut खोटं बोलत आहेत, वंचितचा आरोप)

पुढील २५ वर्षे युवा आणि भारतासाठीही महत्त्वाची – पंतप्रधान मोदी 

पीएम मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, ज्याप्रमाणे १९४७ च्या २५ वर्षाआधी देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी तरुणांवर होती. त्याचप्रमाणे, २०४७ पर्यंत म्हणजेच पुढील २५ वर्षांत भारताला विकसित देश बनवण्याची जबाबदारी तुमची आहे. आजच्या भारतात तुमचे नाव सुवर्णाक्षरात कसे लिहिले जावे हे तुम्हीच ठरवायचे आहे. आमचा वेग, दिशा आणि दृष्टीकोन काय असेल ते तुम्ही ठरवाल. यासाठी मतदान हे प्रमुख माध्यम असेल. पुढील भारताचे भवितव्य उज्वल करण्यासाठी तुम्ही मतदान करणे महत्त्वाचे आहे. तुमचे एक मत आणि भारताच्या विकासाची दिशा जोडलेली आहे. तुमचे एक मत भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. तुमचे एक मत भारतातील डिजिटल क्रांतीला आणखी एक ऊर्जा देईल. (PM Narendra Modi)

१८ ते २५ वर्षे वय असे असते जेव्हा एखाद्याचे जीवन अनेक बदलांचे साक्षीदार असते. या बदलांमध्ये तुम्हा सर्वांना मिळून आणखी एक जबाबदारी पार पाडायची आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सहभागी होण्याची ही जबाबदारी आहे. हा कालावधी दोन कारणांसाठी खूप महत्त्वाचा आहे – पहिले, भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला असताना तुम्ही सर्वजण मतदार झाला आहात. दुसरे म्हणजे, उद्या शुक्रवारी २६ जानेवारीला देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठीही महत्त्वाची आहेत. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.