Vasant Panchami : वसंत पंचमीचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

Vasant Panchami : वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.

713
Vasant Panchami : वसंत पंचमीचा 'हा' इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?
Vasant Panchami : वसंत पंचमीचा 'हा' इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

सर्व ऋतूंचा राजा असणार्‍या वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल वसंत पंचमीच्या दिनी लागते. तसेच हा दिवस देवी सरस्वती आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवसही मानला जातो. वसंत पंचमी हा उत्सव माघ शुद्ध पंचमी या तिथीला साजरा करतात. यंदा ही तिथी मंगळवार, १३ फेब्रुवारी या दिवशी येत आहे. वसंत पंचमी या उत्सवामागील इतिहास आणि त्याचे महत्त्व या लेखातून जाणून घेऊया. (Vasant Panchami)

इतिहास आणि साजरी करण्याची पद्धत
  • कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत.
  • वसंत पंचमी या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.
  • वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.
  • या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते.
वाल्मीकि रामायणातील सरस्वतीदेवीविषयीची कथा

‘सरस्वतीने आपल्या चातुर्याने देवांना राक्षसराज कुंभकर्णापासून कसे वाचवले ?’, याची एक मनोरम कथा वाल्मीकि रामायणाच्या उत्तरकांडात आहे.

देवीचा वर मिळवण्यासाठी कुंभकर्णाने १० सहस्र वर्षे गोवर्णात घोर तपस्या केली. जेव्हा ब्रह्मदेव वर देण्यास सिद्ध झाले, तेव्हा देव त्यांना म्हणाले, ‘‘कुंभकर्ण हा राक्षस आहे आणि तो आपण वर दिल्यामुळे अधिकच उन्मत्त होईल.’’ तेव्हा ब्रह्मदेवाने सरस्वतीचे स्मरण केले. मग सरस्वती त्या राक्षसाच्या जिभेवर आरूढ झाली. सरस्वतीच्या प्रभावामुळे कुंभकर्ण ब्रह्मदेवाला म्हणाला,

स्वप्तुं वर्षाण्यनेकानि देव देव ममेप्सितम् । – वाल्मीकिरामायण, कांड ७, सर्ग १०, श्‍लोक ४५

अर्थ : ‘मी अनेक वर्षांपर्यंत झोपून रहावे’, अशी माझी इच्छा आहे.

वसंतपंचमीचे महत्त्व

महासरस्वतीचा जन्मदिन

वसंत पर्वाचा आरंभ वसंतपंचमीने होतो. याच दिवशी श्री, म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती हिचा जन्मदिन साजरा करण्यात येतो.

सरस्वतीचे पूजन आणि आराधना (Worship of Saraswati)

ब्राह्मणग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अमित तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा अन् आराधना यांसाठी माघ मासातील (महिन्यातील) पंचमी ही तिथी निश्‍चित केली गेली आहे. वसंतपंचमीला तिचा आविर्भाव दिवस मानला जातो. त्यामुळे ‘वागीश्‍वरी जयंती’ आणि ‘श्रीपंचमी’ या नावानेही ही तिथी प्रसिद्ध आहे.

सरस्वतीदेवीचे पूजन करण्याच्या पद्धती

वसंतपंचमीचा हा दिवस सरस्वतीदेवीच्या साधनेसाठीच अर्पण केला जातो. शास्त्रांमध्ये भगवती सरस्वतीची आराधना वैयक्तिक स्वरूपात करण्याचे विधान आहे; पण सध्या सार्वजनिक पूजामंडपांत देवी सरस्वतीची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करण्याचा प्रघात चालू झाला आहे. हा ज्ञानाचा सण असल्यामुळे विद्यार्थी शिक्षण संस्थेची सजावट करतात. विद्यारंभ संस्कारासाठी हा सर्वोत्कृष्ट मुहूर्त आणि दिवस असतो.

नवीन कार्यासाठी शुभदिवस

वसंतपंचमी हा सर्व प्रकारच्या शुभकार्यांसाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला गेला आहे. यांत प्रामुख्याने नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणांतही अतिशय श्रेयस्कर मानले गेले आहे. वसंतपंचमीला शुभमुहूर्त मानण्यामागे अनेक कारणे आहेत. हे पर्व बहुतेक वेळा माघ मासातच येते. माघ मासाचे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. या मासात ‘पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करणे’, हे विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. (Hindu Culture)

वसंत पंचमी या उत्सवाचा उद्देश

या दिवशी सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यांच्यामुळे झालेला आनंद प्रकट करणे आणि मौज करणे, हा या उत्सवाचा उद्देश आहे.

२०२४ मध्ये वसंत पंचमी केव्हा साजरी करावी ?

२०२४ मधील वसंत किंवा वसंत पंचमी १३ फेब्रुवारी, मंगळवारी येते.

पूजेसाठी मुहूर्त : ०६:५३ ते १२:११

वसंत पंचमी मध्यान्ह १२:११ वाजता सुरू होते.

तिथीची प्रारंभ वेळ : ०४:११, १३ फेब्रुवारी २०२४

तिथी असल्यास समाप्ती वेळ : ०१:३९, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी

रब्बी पीक हंगामाची सुरुवात म्हणून वसंत पंचमी हा शेतकऱ्यांसाठी देखील एक महत्त्वाचा दिवस असतो. शेतकरी या दिवशी चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात. (Vasant Panchami)

(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.