Nuclear Power : देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता वाढणार; अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा दावा

117
Nuclear Power : देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता वाढणार; अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचा दावा

देशाची अणुऊर्जा निर्मितीची (Nuclear Power) सध्याची स्थापित क्षमता २३ अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून ७४८० मेगावॉट इतकी असून ती २०३१ पर्यंत २२८४० मेगावॉटपर्यंत वाढेल, असे अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे.

देशात सध्या विविध भागात उभारणी सुरू असलेले आणि मंजुरी मिळालेले प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यावर अणुऊर्जा (Nuclear Power) निर्मितीक्षमता वाढेल असे त्यांनी सांगितले. सरकारने भविष्यात अणुभट्ट्या उभारण्यासाठी नव्या प्रकल्प स्थळांना तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. २०२२-२३ या वर्षात अणुऊर्जा प्रकल्पांमधून ४६,९८२ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती झाली.

(हेही वाचा – Heavy Rain : विदर्भात पुढील चार दिवस मुसळधार तर मुंबईला ऑरेंज अलर्ट)

भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात

भारतातील पहिला अणुऊर्जा (Nuclear Power) प्रकल्प हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर इथं आहे. यामधून सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती केली जाते. १६० मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला. सध्या चार युनिटमधून ही ऊर्जानिर्मिती केली जाते. पहिल्या युनिटमधून १६० दुसऱ्या युनिटमधून १६०, तिसऱ्या आणि चौथ्या युनिटमधून ५४० मेगावॉट ऊर्जा निर्मिती केली जाते. तसेच अन्य राज्यांमध्ये देखील अणुऊर्जा निर्मिती केली जाते. यामध्ये राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.