New Covid Variant : कोरोनाचा BA.2.86 नवा व्हेरिएंट

अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे

168
New Covid Variant : कोरोनाचा BA.2.86 नवा व्हेरिएंट
New Covid Variant : कोरोनाचा BA.2.86 नवा व्हेरिएंट

कोरोनाची तीव्रता जरी कमी झाली असली तरी कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट झालेला नाही.तो काही थांबण्याचे नाव घेत नाही कोरोना व्हायरस त्याचं स्वरूप बदलून नव्या स्ट्रेनमधून आक्रमण करत आहे. अमेरिकेसह अनेक देशांत कोरोनाचा नवा विषाणू (New Covid Variant) आढळला आहे. BA.2.86 नावाचा हा कोरोना व्हेरिएंट अत्यंत घातक स्वरुपाचा आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची फारशी प्रकरणं आढळून आली नसली तरी या महिन्यात १९ ऑगस्टला ७ नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर WHO (World Health Organization) त्यावर देखरेख करत असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या कोरोनाच्या नव्या BA.2.86 व्हेरिएंटची लागण जास्त लोकांना झाली नसली, तरी भविष्यात या विषाणूचा संसर्ग वाढू शकतो.

(हेही वाचा : AI School : देशातील पहिली एआय शाळा तिरुअनंतपुरममध्ये)

‘या’ देशांत आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या BA.2.86 ची माहिती दिली. जगभरातील अनेक देशांत BA.2.86 नावाचा कोरोनाचा नवा प्रकार आढळला आहे. इस्रायल, डेन्मार्क, अमेरिका आणि यूके व्यतिरिक्त स्वित्झर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत हा कोरोना विषाणू आढळला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका प्रमुख अधिकाऱ्याने सांगितलं.

 

कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA.2.86 ची लक्षणं कोणती?
BA.2.86 हा कोरोनाचा नवीन प्रकार असल्याने, त्याची लक्षणं वेगळी किंवा अधिक गंभीर असू शकतात. तथापि, सीडीसी सल्ला देतं की, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून सुरक्षित राहण्यासाठी काही लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. सर्दी, डोकेदुखी,थकवा सतत शिंका येणे, घसा खवखवणे, खोकला, वास घेण्याची क्षमता कमी होणे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.