AI School : देशातील पहिली एआय शाळा तिरुअनंतपुरममध्ये

या शाळेत मुलांना अनेक शिक्षक, विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाणार आहे

86
AI School : देशातील पहिली एआय शाळा तिरुअनंतपुरममध्ये
AI School : देशातील पहिली एआय शाळा तिरुअनंतपुरममध्ये

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमता याची सगळीकडेच चर्चा आहे. याच अनुषंगाने केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एआय शाळा शांतीगिरी विद्याभवन उघडण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नुकतेच एआय स्कूलचे उद्घाटन केले. शाळेत विध्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमतेच्या साहाय्याने भविष्यवेधी शिक्षणाचे धडे मुलांना देणार आहे.

पहिली एआय शाळा इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी असेल. ही एआय शाळा iLearning Engine (ILE) USA आणि Vedic eSchool यांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. या शाळेत मुलांना अनेक शिक्षक, विविध स्तरांची चाचणी, अभियोग्यता चाचणी, समुपदेशन, करिअर नियोजन आणि स्मरण तंत्र याविषयी माहिती दिली जाणार आहे. या शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासही शिकवला जातो. मुलाखत कौशल्ये, ग्रूप डिस्कशन, गणित आणि लेखन कौशल्ये, शिष्टाचारात सुधारणा, इंग्रजी आणि इमोशनल वेल बिंग याबद्दलही माहिती दिली जाते.

(हेही वाचा : Mumbai Milk Price : मुंबईकरांना आता दुधाचा चटका ; सुट्या दुधाच्या दरात होणार ‘इतकी’ वाढ)

शाळेचे अधिकारी म्हणाले, या शाळेत पारंपारिक अध्यापन पद्धती बरोबरच, विद्यार्थ्यांना एआयच्या एआय मदतीने प्रगत साधने आणि संसाधने दिली जातील, ज्याच्या मदतीने विद्यार्थी भविष्यातील आव्हानांसाठी तयार होतील. AI स्कूल हे जगातील सर्वात प्रगत शैक्षणिक प्लॅटफॉर्म AI स्कूल, iLearning Engines आणि Vedhik eSchool भागीदारी द्वारे काळजीपूर्वक तयार केलेले, नाविन्यपूर्ण शिक्षणाचे दीपस्तंभ म्हणून उदयास आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानामध्ये रुजलेले, हे विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय शैक्षणिक अनुभवाचे धडे देणार आहे.पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे, एआय स्कूलला भविष्यातील संधींचे प्रवेशद्वार म्हणून पहिले जाते . JEE, NEET, CUET, CLAT, GMAT, आणि IELTS यासह स्पर्धात्मक परीक्षांसाठी सखोल प्रशिक्षण देऊन, शाळा हे सुनिश्चित करते की ते विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पात्र आहेत.  विद्यार्थ्यांना शिकण्याची ही नवीन पद्धत खरोखर चांगले शिक्षण देणार आहे आणि मुले खूप काही शिकणार आहेत असेही अधिकारी म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.