Nawaz Sharif : शेजारच्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हवेत; नवाझ शरीफ यांना उपरती

आम्हाला पाकिस्तानच्या विकासासाठी शेजाऱ्यांबरोबर आणि जगाबरोबर चांगले संबंध हवे आहेत, हे उद्गार आहेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे ! ते मिनार-इ-पाकिस्तान येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

23
Nawaz Sharif : शेजारच्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हवेत; नवाझ शरीफ यांना उपरती
Nawaz Sharif : शेजारच्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध हवेत; नवाझ शरीफ यांना उपरती

आम्हाला एका स्वतंत्र आणि व्यापक स्वरूपाच्या परराष्ट्र धोरणाची गरज आहे. (Nawaz Sharif) आम्हाला जगाबरोबर सहकार्याने आणि समानतेने राहायचे आहे. आम्हाला शेजारच्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम देश घडवायचा आहे. दुसऱ्यांशी लढून आणि संघर्ष करून पाकिस्तानचा विकास होणार नाही. मी बदला घेण्यासाठी नाही, तर विकास करण्यासाठी उत्सुक आहे. जर पाकिस्तान पूर्व पाकिस्तानपासून (बांगलादेशपासून) वेगळा झाला नसता, तर भारतामधून जाणारा एक इकनॉमिक कॉरिडोअर तयार झाला असता. आम्हाला पाकिस्तानच्या विकासासाठी शेजाऱ्यांबरोबर आणि जगाबरोबर चांगले संबंध हवे आहेत, हे उद्गार आहेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे ! ते मिनार-इ-पाकिस्तान येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. (Nawaz Sharif)

(हेही वाचा – Dalip Tahil : ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार जाणार दोन महिन्यांसाठी तुरुंगात)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ 4 वर्षे ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर पुन्हा मायदेशी परतले आहेत. जानेवारी महिन्यात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी नवाझ शरीफ पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे सर्वेसर्वा असलेले नवाझ शरीफ ‘उमीद-इ-पाकिस्तान’ या विशेष विमानाने दुबईहून पाकिस्तानमध्ये आले. यानंतर त्यांनी मिनार-इ-पाकिस्तान येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ‘भारताबरोबर चांगले संबंध हवेत’, असा थेट उल्लेख केला आहे. नवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणामध्ये शेजारच्या देशाबरोबर चांगले संबंध निर्माण करून काश्मीरचा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला पाहिजे असेही म्हटले आहे. (Nawaz Sharif)

निवडणुका समोर ठेवून मतांसाठी वक्तव्ये

पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर शेजारच्या देशांकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. (Nawaz Sharif) पाकिस्तान वगळता सगळ्या देशांनी भारताला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. डिसेंबर 2015 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी लाहोरमध्ये जाऊन तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी नवाझ शरीफ यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता, दोन्ही देशांमधील सहकार्य यासारख्या गोष्टींवर चर्चा केली होती. त्यानंतरही भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या बाजूने होणारे दहशतवादी हल्ले थांबले नव्हते. यानंतरच पुलवामा येथे भारतीय जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला पाकिस्तानने घडवून आणला. यानंतर भारताने पाकिस्तानवर आधी सर्जिकल स्ट्राइक आणि नंतर एअर स्ट्राइक केला होता. आता पाकिस्तानची स्थिती भुकेकंगाल आहे, तर भारताचे वर्चस्व जागतिक स्तरावर वाढत आहे. पाकिस्तानमध्ये येत्या काही महिन्यांत  निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ हे मतांसाठी अशी वक्तव्ये करत आहेत, अशी चर्चा चालू आहे. (Nawaz Sharif)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.