IND vs NZ Weather Update : धरमशालामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या सामना रद्द झाल्यास काय होणार?

26
IND vs NZ Weather Update : धरमशालामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या सामना रद्द झाल्यास काय होणार?

आज म्हजेच रविवार २२ ऑक्टोबर रोजी भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Weather Update) हे गुणतालिकेतील दोन अव्वल संघ धरमशाला इथं आमने सामने येणार आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीमुळे सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामी यांना संघात संधी मिळणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. तसेच शार्दूल ठाकूरला डगआऊटमध्ये बसावं लागणार आहे. पण, आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे.

दोन्ही संघानी वर्ल्ड कप 2023 (IND vs NZ Weather Update) मधील आतापर्यंतच्या प्रत्येकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघ आपल्या सलग पाचव्या विजयासाठी आज मैदानात उतरणार आहेत. मात्र, चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे.

(हेही वाचा – Dalip Tahil : ‘हा’ प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार जाणार दोन महिन्यांसाठी तुरुंगात)

अ‍ॅक्यू वेदरच्या रिपोर्टनुसार, धर्मशालेत पाऊस पडण्याची (IND vs NZ Weather Update) शक्यता 40 टक्के आहे. दुपारच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते. तर, संध्याकाळी पावसाची शक्यता कमी आहे. पण तापमान सुमारे 12-13 अंशांच्या आसपास घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील धर्मशाला येथे खेळवण्यात आलेला मागील सामना देखील पावसामुळे प्रभावित झाला होता. पाऊस पडल्यामुळे हा सामना फक्त 43 षटकांचा खेळवण्यात आला होता.

भारत आणि न्यूझीलंडचा सामना रद्द झाल्यास काय होणार?

वर्ल्ड कप 2023 साठी (IND vs NZ Weather Update) आयसीसीच्या नियमांनुसार, लीग सामन्यांसाठी ‘राखीव दिवस’ ठेवला नाही. आजचा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे वाहून गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. आतापर्यंतच्या वर्ल्ड कपच्या एकाही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला नाही ही चांगली गोष्ट आहे. मात्र, 17 ऑक्टोबरला धरमशाला येथे झालेल्या नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात पावसामुळे 43 षटकांचा खेळ झाला. त्याच वेळी, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम येथे भारताचे वर्ल्ड कप 2023 चे दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. (IND vs NZ Weather Update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.