Navinchandra Bandivadekar: पतितपावन मंदिर हे वीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या मैत्रीचे प्रतीक : नवीनचंद्र बांदिवडेकर

यावेळी बांदिवडेकर म्हणाले, ''जातीय भेदभाव करू नये हा सर्वांत मोठा धडा भागोजीशेठ कीर यांनी घालून दिला. ते मानवतावादी होते, हिंदुत्ववादी होते म्हणूनच त्यांनी केवळ आपल्या समाजापुरतेच न करता मानवतेसाठी, देशासाठी कार्य केले.

93
Navinchandra Bandivadekar: पतितपावन मंदिर हे वीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या मैत्रीचे प्रतीक : नवीनचंद्र बांदिवडेकर
Navinchandra Bandivadekar: पतितपावन मंदिर हे वीर सावरकर आणि भागोजीशेठ कीर यांच्या मैत्रीचे प्रतीक : नवीनचंद्र बांदिवडेकर

पतितपावन मंदिर हे भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. भागोजीशेठ कीर यांच्याकडे जातीय भेदभावापलीकडची मानवतेची दूरदृष्टी होती. पतितपावन मंदिर भागोजींनी बांधले. हे मंदिर वीर सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी. यासाठी शालेय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला आहे. ही चूक तातडीने दुरुस्त झाली पाहिजे. मुलांना चुकीचा इतिहास शिकविला जाता कामा नये. तसेच पतितपावन मंदिर हे सर्वांचे आहे, सर्वांचे राहील, त्यावर कोणीही अधिकार सांगू नये, असे प्रतिपादन अखिल भारतीय भंडारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर (Navinchandra Bandivadekar) यांनी केले. श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीत शनिवारी (दि. २४ फेब्रुवारी) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हा कार्यक्रम रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने पतितपावन मंदिरात आयोजित करण्यात आला होता. या वेळी कोळी महासंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष ॲड. चेतन पाटील, जैन समाज संघाचे वर्धमान स्थानकवासी महेंद्र गुंदेजा, श्रीमान भागोजीशेठ कीर यांचे नातू अंकुर कीर, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, भंडारी समाज नेते कुमार शेट्ये, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, प्रसिद्ध व्यावसायिक राजन मलुष्टे, परीट समाज संघाचे अध्यक्ष अमित कोरगावकर, दलित मित्र एस. बी. खेडेकर, तेली समाज संघाचे सचिन लांजेकर, भगवती देवी ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला परीट समाज संघाचे प्रभाकर कासेकर, श्रीराम कट्टा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा लिमये आणि मान्यवर उपस्थित होते.

श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय भंडारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार लेखक अभिजित हेगशेट्ये यांचा प्रतिभावान व्यक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

महामानवाला मात्र ९० फुटांमध्ये बंदिस्त

यावेळी बांदिवडेकर म्हणाले, ”जातीय भेदभाव करू नये हा सर्वांत मोठा धडा भागोजीशेठ कीर यांनी घालून दिला. ते मानवतावादी होते, हिंदुत्ववादी होते म्हणूनच त्यांनी केवळ आपल्या समाजापुरतेच न करता मानवतेसाठी, देशासाठी कार्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिपुरुष होते. त्यांच्याकडूनच भागोजीशेठना प्रेरणा मिळाली. भागोजीशेठनी आपला मुंबईतील नऊ एकरचा भूखंड दिला, पण या महामानवाला मात्र ९० फुटांमध्ये बंदिस्त करण्यात आले. ही गोष्ट राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर गेल्या वर्षी मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई शहरात नाना शंकरशेठ आणि भागोजीशेठ कीर यांचे पुतळे उभारणार असल्याची घोषणा केली आणि त्यासाठी २० कोटींची तरतूदही केली” मात्र त्यांचे हे स्मारक त्यांच्याच भूमीत व्हावे, अशी आमची मागणी आहे.”

प्रस्तावनेत राजीव कीर यांनी भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले. रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप येथील चौक रस्त्यावर सर्कल बनवून तेथे श्रीमान भागोजीशेठ कीर, यांचा तसेच संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यांनी याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. याचा पाठपुरावा करण्याचा मुद्दाही आजच्या कार्यक्रमात उपस्थित करण्यात आला.

या कार्यक्रमात वैश्य समाज, तेली समाज, कटबू समाज, नाभिक समाज, खारवी समाज, गाबित समाज, राठोड समाज, वर्धमान स्थानकवासी जैन समाज, त्वष्टा कासार समाज, शिंपी, कुणबी, सुतार, ब्राह्मण, मराठा, कोळी समाज, कुंभार, परीट, भंडारी असे सर्व समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी रत्नागिरी शहरात रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीमध्ये संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबा यांचा सामाजिक संदेश देणारा चित्ररथ सहभागी झाला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.