National Police Memorial Day: राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात अमित शाहांची उपस्थिती, हुतात्मा पोलिसांना वाहिली श्रद्धांजली

83
National Police Memorial Day: राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात अमित शाहांची उपस्थिती, हुतात्मा पोलिसांना वाहिली श्रद्धांजली
National Police Memorial Day: राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात अमित शाहांची उपस्थिती, हुतात्मा पोलिसांना वाहिली श्रद्धांजली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सकाळी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन (National Police Memorial Day) कार्यक्रमात सहभागी झाले. देशाची राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गृहमंत्री शाह यांनी हुतात्मा पोलिसांना श्रद्धांजली वाहिली.

ट्विटरद्वारे राष्ट्रीय पोलीस स्मरण दिनानिमित्त त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, राष्ट्रीय पोलीस दिनानिमित्त सैन्य दलातील महान आत्म्यांनी मी प्रणाम करतो. त्यांच्या बलिदानामुळे आशेचा किरण प्रजल्वित झाला. त्यांनी गाजवलेल्या शौर्यकथा आम्ही कधीही विसरू शकत नाही. राष्ट्र त्यांच्याप्रती अनंतकाळ कृतज्ञ राहील, अशी श्रद्धांजली त्यांनी हुतात्म्यांना अर्पण करून मातृभूमीच्या शूरवीरांना प्रणाम केला.

(हेही वाचा – Gaganyaan mission : भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेचे पाऊल पडणार, उड्डाणानंतर ३ चाचण्यांची पूर्तता)

उल्लेखनीय आहे की 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखच्या हॉट स्प्रिंग भागात सशस्त्र चिनी तुकडीने केलेल्या हल्ल्यात 10 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या हुतात्म्यांच्या आणि इतर सर्व पोलिसांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबरला राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 च्या पोलीस स्मृती दिनी राष्ट्रीय पोलीस स्मारक राष्ट्राला समर्पित केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.