Solapur Police : सोलापूर पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, ३०० किलो कच्चा माल, १ हजार लिटर रसायन जप्त

मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसीत पोलिसांनी छापा टाकला होता.

69
Solapur Police : सोलापूर पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, ३०० किलो कच्चा माल, १ हजार लिटर रसायन जप्त
Solapur Police : सोलापूर पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, ३०० किलो कच्चा माल, १ हजार लिटर रसायन जप्त

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी (Solapur Police) ड्रग्स (Drugs) प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. एमडीसाठी लागणारा 300 किलो कच्चा माल ( raw materials) आणि जवळपास 1 हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त ( seized ) केलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली.

मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसीमधील एस एस केमिकल्स या बंद स्थितीत असलेल्या कंपनीत आरोपींनी कच्चा माल ठेवला होता. यावेळी घातलेल्या छाप्यात आढळलेल्या रसायनांची तपासणी करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. या कारवाईत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळ कारवाई करत 3 किलो 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडले होते. जवळपास 6 कोटी रुपये किमत असलेल्या या ड्रग्जसह पोलिसांनी दत्तात्रय लक्ष्मण घोडके आणि गणेश उत्तम घोडके या दोन आरोपींना अटक केली होती. आरोपींनी तपासात दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी एमआयडीसीत छापा टाकला होता. तिथेच तब्बल 300 किलो एमडीसाठी लागणारा कच्चा माल सापडला.

(हेही वाचा – High court : हायकोर्टाच्या ११२ न्यायाधीशांची नियुक्ती रद्द, नेमके काय आहे कारण?)

मोहोळमध्ये गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणानंतर कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ-पाटील हेदेखील सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी मोहोळ येथील चिंचोळी परिसरता ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कंपनीची पाहणी केली. तसेच या प्रकरणाशी निगडीत काही घटना स्थळांनादेखील भेट दिली. सोलापूर ग्रामीण पोलिसांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले. ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. डीवायएसपी. अमोल भारती बी. फार्मसी आहेत. त्यामुळे रसायन तपासणीत त्यांची मदत झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज प्रकरणात सोलापुरातून अटक केलेले आरोपी गवळी बंधू आणि या प्रकरणातील आरोपींचे संबंध असल्याचेदेखील समोर आलं आहे. त्यामुळे गवळी बंधूंची मुंबईतील पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेण्यासाठी सोलापूर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.