राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस : कर्करोगाची लक्षणे ओळखा!

95

राष्ट्रीय कर्करोग जागरूकता हा दिवस सोमवारी 7 नोव्हेंबरला साजरा केला जातो. गेल्या दहा वर्षांत कर्करोग बऱ्याच अंशी वाढला आहे. कर्करोग प्राणघातक असला तरीही आता कर्करोगावर उपचार शक्य आहेत. प्राथमिक स्तरावर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णाचे प्राण वाचवता येतात. कर्करोगाची त्वरित तपासणी आणि निदान करून घ्या, असे आवाहन कर्करोगतज्ज्ञ करत आहेत.

( हेही वाचा  : मुंबई ते नागपूर फक्त ८ तासात! समृद्धी महामार्गावर प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधा )

कर्करोगाची लक्षणे

  • तीन आठवड्यांपेक्षाही अधिक दिवस तोंड आणि जिभेवर जखम आढळून येणे
  • अन्न गिळताना होणारा त्रास
  • लघवीला त्रास होत असल्यास
  • 4 ते 5 आठवड्यापेक्षाही जास्त काळ जुलाब होणे
  • तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असणे
  • स्तनातील सूज
  • लघवी आणि शौचालयातून होणारा रक्तस्त्राव
  • महिलांना मासिक पाळीव्यतिरिक्त शौचातून होणारा रक्तस्त्राव

ही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांना तातडीने संपर्क साधा

  • शरीराच्या कोणत्याही अवयवात सूज येणे
  • तीळाच्या आकारात किंवा रंगात बदल
  • जखम भरत नसल्यास
  • सतत ताप येणे किंवा वजनात घट होणे
  • चार आठवड्यांपेक्षा अधिक काळ अंगदुखी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.