Nashik: वालदेवी नदीत लाखो मृत माशांचा खच, कारण काय? वाचा सविस्तर

140
Nashik: वालदेवी नदीत लाखो मृत माशांचा खच, कारण काय? वाचा सविस्तर

नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृत अवस्थेत आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदीमध्ये २ किलोमीटरपर्यंत मृत माशांचा अक्षरशः खच पडलेला असून ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नदी पात्रात जवळपास २ किलोमीटरपर्यंत लाखो मृत माशांचा खच पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन फुटून दूषित पाणी नदीत गेल्यामुळे हे मासे मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मृत पावलेले मासे नदीत तरंगत असून नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जिवाणूदेखील आढळून आले आहेत. या प्रकारामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरातील नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

(हेही वाचा –T20 World Cup 2024 : सुरतच्या एका कंपनीने प्लास्टिक कचऱ्यापासून बनवले २० संघांच्या राष्ट्रध्वजाचे कोलाज )

वीजनिर्मिती केंद्राला मुसळधार पावसाचा मोठा फटका
दरम्यान, नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. मध्यरात्री मुसळधार पावसात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महा पारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने नाशिक शहरातील काही भागासह ७० ते ८० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.