Tata Cancer Hospital Mumbai : टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा दैदिप्यमान इतिहास; काय आहेत वैशिष्ट्ये?

105
Tata Cancer Hospital Mumbai : टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा दैदिप्यमान इतिहास; काय आहेत वैशिष्ट्ये?

टाटा मेमोरियल हॉस्पिटल (TMH) हे मुंबईतील परळ येथील एक कर्करोगाचे रुग्णालय आहे. ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत असलेली संस्था आहे. १९३२ मध्ये रक्ताच्या कर्करोगाने मेहेरबाई टाटा यांचे निधन झाले. ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले, तशा प्रकारचे रुग्णालय त्यांचे पती दोराबजी टाटा यांना भारतात उभारायचे होते. (Tata Cancer Hospital Mumbai)

दोराबजी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी नोरोजी सकलतवाला यांनी हे प्रयत्न सुरु ठेवले. अखेर, जेआरडी टाटांच्या सहकार्यामुळे, मुंबईतील परळच्या मध्यभागी २८ फेब्रुवारी १९४१ रोजी टाटा मेमोरियल हॉस्पिटलची सात मजली इमारत बांधून पूर्ण झाली. १९५७ मध्ये, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा तात्पुरता ताबा घेतला. १९६२ मध्ये, रुग्णालयाचे प्रशासकीय नियंत्रण भारताच्या अणुऊर्जा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. चार वर्षांनंतर, १९५२ मध्ये स्थापन झालेली कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट आणि टीएमसी यांचे विलीनीकरण झाले. (Tata Cancer Hospital Mumbai)

(हेही वाचा – Kanakapura Resorts : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ’कनकपुरा’ येथील ५ कौटुंबिक रेसॉर्ट्सबद्दल जाणून घ्या)

१५,००० स्क्वेअर मीटर परिसरात पसरलेल्या या रुग्णालयाची सुरुवात ८० बेड्सपासून झाली, आता या रुग्णालयाचा विस्तार झाला असून अंदाजे ७०,००० स्क्वेअर मीटरमध्ये पसरले आहे, ज्यामध्ये ६०० पेक्षा जास्त बेड्स आहेत. १९४१ मध्ये वार्षिक बजेट ५ लाख रुपये होते, आता ते रु. १२० कोटींच्या जवळपास पोहोचले आहे. इथे मोठ्या संख्येने रुग्ण येतात. ६० टक्के रुग्णांवर मोफत उपचार केले जाते. (Tata Cancer Hospital Mumbai)

या संस्थेत कॅन्सरच्या क्षेत्रातील शिक्षणावर अधिक भर दिला जातो. रुग्णालयामध्ये २५० हून अधिक विद्यार्थी, वैद्यकीय व्यावसायिक, शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण दिले जाते. भारत आणि दक्षिण आशियातील कर्करोगावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतीय अणुऊर्जा विभागाने नवी मुंबईतील खारघर येथे ‘ऍडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट अँड एज्युकेशन इन कॅन्सर’ नावाचे अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक आशेचा किरण आहे. (Tata Cancer Hospital Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.