Kanakapura Resorts : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ’कनकपुरा’ येथील ५ कौटुंबिक रेसॉर्ट्सबद्दल जाणून घ्या

89
Kanakapura Resorts : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ’कनकपुरा’ येथील ५ कौटुंबिक रेसॉर्ट्सबद्दल जाणून घ्या

कनकापुरा (Kanakapura) हे कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील अर्कावथी नदीच्या काठावर असलेले एक शहर आहे आणि कनकपुरा हे तालुक्याचे प्रशासकीय केंद्र देखील आहे. कावेरी नदी कनकपुराच्या तालुक्यात वाहते. कर्नाटक राज्यातील हिरव्यागार जंगलांमध्ये स्थित असलेलं हे शहर पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. (Kanakapura Resorts)

विशेषतः हे संपूर्ण कर्नाटक राज्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे, कारण येथे ट्रेकर्सपासून इतिहासप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी सर्व जण आनंद लुटू शकतात. या तालुक्यातील वनक्षेत्र खूप विस्तृत आहे आणि बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानाचा अर्धा भाग कनकापुरा (Kanakapura) परिसरात आहे. कोडिहल्ली वन्यजीव आणि हरोहल्ली वन्यजीव याचा विभाग आहे. कावेरी वन्यजीव अभयारण्यात संगम वन्यजीव, मुग्गुर वन्यजीव या दोन मुख्य क्षेत्रांचा समावेश आहे. (Kanakapura Resorts)

आता अशा सुंदर ठिकाणाला भेट द्यायची असेल तर आसपास चांगल्या दर्जाचे रिसॉर्ट्स हवेत, जेणेकरुन तुम्ही मुक्कामाचाही आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला ५ अशा रिसॉर्ट्सची माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही कुटुंबासोबत बिनधास्तपणे वेळ घालवू शकता. (Kanakapura Resorts)

(हेही वाचा – BMC Security Force : मुंबई महापालिकेच्या सुरक्षा सेवेवरील वाढतोय ताण! काय आहे कारण, वाचा)

अमेगुंडी रिसॉर्ट :

बंगळुरु जवळ स्थित, हे रिसॉर्ट आलिशान आहे आणि जोडप्यांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. यात एक आऊटडोअर स्विमिंग पूल, एक रेस्टॉरंट आणि मोफत वायफाय अशी सुविधा आहे.
पत्ता: १७/३ केरललुसंद्र मालागालू पोस्ट, चाकनाहल्ली, कर्नाटक ५६२११७.
फोन: ०८९२९१ ००६६६. (Kanakapura Resorts)

कादगल रिसॉर्ट :

वंडरलापासून ४६ किमी अंतरावर असलेल्या या रिसॉर्टमध्ये आउटडोअर स्विमिंग पूल, मोफत पार्किंग आणि रेस्टॉरंट आहे. हे बॅनरघट्टा नॅशनल पार्क आणि पिरॅमिड व्हॅली सारख्या आकर्षक स्थळांच्या जवळ आहे.
पत्ता: ११०/७, केरलालुसंद्र, मलागालू पोस्ट, कनकपुरा, कर्नाटक ५६२११७.
फोन: ०९७३९५ ५५३६३. (Kanakapura Resorts)

बायवू, दि व्हिलेज :

बायवू रिसॉर्टमध्ये तुम्हाला कर्नाटकच्या संस्कृतीचा आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा ग्रामीण अनुभव मिळतो.
पत्ता: बायवू रोड, कनकपुरा, कर्नाटक: ५६२११७. (Kanakapura Resorts)

हॅपी होम रिसॉर्ट :

Tripadvisor वर हॅपी होम रिसॉर्टला १० पैकी ८ रेटिंग मिलाले आहे. विशेष म्हणजे हे ४-स्टार हॉटेल आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही इथे आला असाल तरी तुम्ही निवांत काम करु शकता आणि आराम करण्याच्या उद्देशाने आला असाल तरी देखील हे आदर्श ठिकाण आहे. (Kanakapura Resorts)

दि ऑटेरा :

या रिसॉर्टचे वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स सिटीमधील एक अत्याधुनिक ५-स्टार रिसॉर्ट आहे. इथे तुम्हाला अनेक सुविधा प्राप्त होतील, ज्यामध्ये वाय-फाय, पार्किंग, एअरपोर्ट ट्रान्स्पोर्टेशन आणि बरेच काही… (Kanakapura Resorts)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.