BMC Security Force : मुंबई महापालिकेच्या सुरक्षा सेवेवरील वाढतोय ताण! काय आहे कारण, वाचा

2669
BMC : महापालिकेतील कंत्राट कामांच्या शोधात काँग्रेस, केला जातो माहिती अधिकाराचा वापर

मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या (BMC Security Force) खात्यातील उप प्रमुख सुरक्षा अधिकारी, विभागीय सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी संवर्गासह सुरक्षा रक्षक यांची अनेक पदे रिक्त आहेत. परंतु ही पदे भरण्यात प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाही. त्यामुळे या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच सुरक्षारक्षकांना अतिरिक्त कामाचा बोजा सहन करावा लागत आहे. (BMC Security Force)

मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलाच्या (BMC Security Force) खात्यातील उप प्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गाची एकूण १२ पदे असून ५ पदे रिक्त आहेत. तसेच विभागीय सुरक्षा अधिकाऱ्यांची १८ पदे असून, त्यातील ४ पदे रिक्त आहेत आणि सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांची ६५ पदे असून, त्यातील ५५ पदे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. ही रिक्त पदे भरण्यात यावीत, याकरिता कामगार संघटनांकडून वारंवार मागणी होत आहे. (BMC Security Force)

सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकरिता विद्यमान अर्हतेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने ऑफिसर्स असोसिएशनची ३० ऑगस्ट २०२३ रोजी उप आयुक्त (उद्याने) यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चेअंती प्रस्तावित अर्हतेस असोसिएशनकडून मान्यता देण्यात आली. ही मान्यता देऊन दहा महिने होत आले तरी, सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही झालेली नाही. विभागीय सुरक्षा अधिकारी व उप प्रमुख सुरक्षा अधिकारी संवर्गाची अर्हता प्राप्त करणारे अधिकारी असून, त्यांना सदर पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. (BMC Security Force)

(हेही वाचा – Modi Cabinet : कुणाला मिळणार कुठलं खातं? उत्सुकता शिगेला)

आयुक्तांनी केली ही विनंती 

पर्यायाने संबंधितांचे खूपच आर्थिक व सामाजिक नुकसान करण्यात आलेले आहे. अधिकाऱ्यांना स्वतःचे काम सांभाळून ३ ते ४ विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गणवेषधारी अधिकारी असल्याने त्रास सहन करुन ते आदेशांचे पालन करीत आहेत. प्रशासनाच्या या मनमानीमुळे अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला असून, ही बाब महापालिकेस हितकारक नाही, याकडे दी म्युनिसिपल युनियनने लक्ष वेधले आहे. (BMC Security Force)

दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना निवेदन देऊन सुरक्षा दलातील उप प्रमुख सुरक्षा अधिकारी, विभागीय सुरक्षा अधिकारी व सहाय्यक सुरक्षा अधिकारी संवर्गाची रिक्त पदे तात्काळ भरण्याबाबत उचित कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान, महापालिका सुरक्षा विभागातील सुमारे १२०० सुरक्षा रक्षक भरतीची प्रक्रिया रखडली असून त्यातच १५० हून अधिक सुरक्षा रक्षक लिपिक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे आधीच सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त होती. त्यात आणखी १५० हून अधिक जागा रिक्त झाल्याने याच्या परिणाम महापालिकेच्या सुरक्षा सेवेवर होत आहे. (BMC Security Force)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.