French Open 2024 : इगा स्वियातेकची विक्रमी तिसऱ्या फ्रेंच ओपन विजेतेपदाला गवसणी

French Open 2024 : अंतिम फेरीत जस्मिन पायोलिनीचा इगाने ६-२ आणि ६-१ असा धुव्वा उडवला.

114
French Open 2024 : इगा स्वियातेकची विक्रमी तिसऱ्या फ्रेंच ओपन विजेतेपदाला गवसणी
  • ऋजुता लुकतुके

यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये पुरुषांच्या गटात चुरस दिसून आली. तर महिलांमध्ये इगा स्वियातेकचा (Iga Swiatek) एकछत्री अंमल होता. अंतिम फेरीतही तिनेच वर्चस्व गाजवलं. आणि प्रतिस्पर्धी जस्मिन पायोलिनीचा ६-२, ६-१ असा पराभव करत तिने सलग तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकण्याचा विक्रम केला. यापूर्वी अशी कामगिरी मोनिका सेलेस आणि जस्टिन हेनेन या दोनच व्यावसायिक टेनिसपटूंनी केली आहे. इतकंच नाही, तर इगाने मागच्या ५ वर्षांत चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. (French Open 2024)

विजेतेपदानंतर इगाने (Iga Swiatek) सर्वांचे आभार मानले. ‘मला ही स्पर्धा खूप आवडते आणि दरवर्षी या स्पर्धेची मी वाट बघते. त्यात इथं विजय मिळवता आला तर मला आणखी आनंद होतो. प्रेक्षकांचा पाठिंबा आणि घरच्यांचं सहकार्य याशिवाय मी हे करू शकले नसते,’ अशी प्रतिक्रिया इगाने या विजयानंतर दिली आहे. (French Open 2024)

मागच्या ५ वर्षांत इगाने (Iga Swiatek) क्ले कोर्टची सम्राज्ञी असं टोपणनाव मिळवलं आहे. (French Open 2024)

(हेही वाचा – Bus Terror Attack : जम्मूत यात्रेकरुंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात!)

२३ वर्षीय पोलिश टेनिसपटू इगा स्वियातेक (Iga Swiatek) सध्या महिलांमध्ये अव्वल खेळाडू आहे. तिच्या खात्यात ५ ग्रँडस्लॅम विजेतेपदं जमा आहेत. पण, यातील ४ तिने पॅरिसमध्ये पटकावली आहेत. या व्यतिरिक्त २०२२ मध्ये तिने अमेरिकन ओपन विजेतेपदही पटकावलं आहे. फ्रेंच ओपनमध्ये आता तिने सलग ३७ सामने जिंकले आहेत. आणखी एक विक्रम या स्पर्धेत तिच्या नावावर आहे. २०२१ मध्ये तिने अंतिम फेरीत जिंकेपर्यंत फक्त ५ गेम गमावले होते. तिचं या स्पर्धेतील वर्चस्वच असं आहे. आताही तिने अंतिम फेरीपर्यंत फक्त एकदाच सेट गमावला आहे. (French Open 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.