Nanded Hospital Tragedy : पुन्हा सात जणांचा मृत्यू

28
Nanded Hospital Tragedy : पुन्हा सात जणांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. या घटनेची आता नांदेड (Nanded Hospital Tragedy) येथे पुनरावृत्ती झाली आहे. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात एका दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. तर रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे. तर याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

अशातच आता आज म्हणजेच मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा सात जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या सात जणांमध्ये ४ बालकांचा समावेश आहे. हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात (Nanded Hospital Tragedy) औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयात वेळेवर औषधांचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे.

(हेही वाचा – Gadchiroli : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील महिलांना सामाजिक संस्थांचे साहाय्य)

नांदेडमधील (Nanded Hospital Tragedy) या सर्व घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

छावा संघटना आणि स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दाखल झाले. या पदाधिकारी (Nanded Hospital Tragedy) आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तसेच, त्यांनी यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.