Gadchiroli : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील महिलांना सामाजिक संस्थांचे साहाय्य

31
Gadchiroli : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील महिलांना सामाजिक संस्थांचे साहाय्य
Gadchiroli : गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील महिलांना सामाजिक संस्थांचे साहाय्य

गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महिलांना शंभर धुरविरहित चुलींचे वाटप करण्यात आले. (Gadchiroli) पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातून (Gadchiroli) गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावेळी कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, तसेच रोटरी क्लब, साऊथ ईस्ट नागपूरचे अध्यक्ष राजीव वरभे, माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूरचे अध्यक्ष सुहास खरे व रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्टच्या फर्स्ट लेडी स्मिता वरभे मॅडम हे उपस्थित होते. (Gadchiroli)

(हेही वाचा – October 2023 : यंदाच्या ऑक्टोबरमध्ये सणा-वारांसह अनुभवा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण)

या चुली अविघ्न ग्रुप मुंबई, रोटरी क्लब ऑफ क्वीन सिटी मुंबई, रोटरी क्लब ऑफ साउथ ईस्ट नागपूर आणि माऊलीमित्र सेवा मंडळ यांनी प्रायोजित केल्या आहेत. महिलांना स्मोकलेस चुलीच्या वापराने धुरामुळे होणारा त्रास कमी होईल. (Gadchiroli)

नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा व गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आवाहन या वेळी करण्यात आले. (Gadchiroli)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.