Nagpur Vidhan Bhavan पाडणार; कशी असेल नवी इमारत? वाचा…

535
Nagpur Vidhan Bhavan पाडणार; कशी असेल नवी इमारत? वाचा...
  • प्रतिनिधी

नागपूर विधानभवनाचा चेहरामोहरा लवकरच बदलणार असून, सात मजली नवे संकुल, भुयारी टनेल, आणि चौदा मजली प्रशासकीय इमारतीच्या भव्य योजनांचा आराखडा बुधवारी सादर करण्यात आला. विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले, “ही वास्तू केवळ प्रशासकीय नसून महाराष्ट्राची ओळख ठरेल.” या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. (Nagpur Vidhan Bhavan)

(हेही वाचा – Institute of Religious Education : येमेनमधील दोन नागरिक बेकायदेशीररित्या…; गृह राज्यमंत्र्यांचा खळबळजनक खुलासा)

प्रमुख वैशिष्ट्ये :
  • सध्याच्या विधानभवन जागेवर सात मजली नवे संकुल, ऐतिहासिक शैली कायम ठेवणार.
  • सेंट्रल हॉल, विधानसभा, विधानपरिषद, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांची कार्यालये एकाच ठिकाणी.
  • मंत्रिमंडळ सदस्यांसाठी सहा मजली स्वतंत्र इमारत.
  • विधानभवन व प्रशासकीय इमारत भुयारी टनेलने जोडणार.
  • मुद्रणालयाच्या जागेवर चौदा मजली प्रशासकीय इमारत.
  • चार लाख चौ. फुट जागेत मंत्रालयीन कार्यालये.
  • वाहनतळ, उपहारगृह, अभ्यागत कक्ष, सुरक्षा कक्ष आदी सर्व सोयी.

(हेही वाचा – बी. एड. महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई होणार; मंत्री Chandrakant Patil यांची माहिती)

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हरित इमारतीची संकल्पना राबवण्याचा आणि अभ्यागतांसाठी उत्तम सोयी उपलब्ध करण्याचा निर्देश दिला. विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले असून, हे काम महामंडळामार्फतच पार पडणार आहे. या विस्तारीकरणानंतर नागपूर विधानभवन हे आधुनिकतेचे प्रतीक ठरेल आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला जाईल. (Nagpur Vidhan Bhavan)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.