तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा (Water Cut) करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे सोमवारी, 8 डिसेंबरसकाळपासून उद्या मंगळवारी, 9 डिसेंबर रात्रीपर्यंत 15 टक्के पाणीकपात होणार आहे. मुंबईतील एकूण 25 प्रशासकीय विभागांपैकी 17 विभागांमध्ये ही पाणीकपात लागू असेल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ही जलवाहिनी जुनी झाली होती. त्यामुळे भविष्यातील दक्षता म्हणून ती बदलण्यात येत आहे. जलवाहिनी बदलण्याचे काम 24 तास अखंड सुरू ठेवून पूर्ण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
कोणत्या भागांना फटका बसणार?
पाणीकपातीचा (Water Cut) सर्वाधिक फटका दक्षिण मुंबई आणि उपनगरांनाही बसणार आहे. यामध्ये कुलाबा, काळबादेवी, मरिन लाईन्स, मलबार हिल, वरळी, दादर, माहीम या भागांना या पाणी कपातीचा फटका बसणार आहे. तसेच बांद्रे, खार, अंधेरी, विलेपार्ले, जुहू, गोरेगाव, मालाड, बोरिवली, दहिसर, कुर्ला, भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर ही उपनगरंदेखील पाणी कपातीमुळे प्रभावित होणार आहेत.
(हेही वाचा IndiGo ची ६ दिवसांत ३,९०० उड्डाणे रद्द; डीजीसीएने कंपनीच्या वरिष्ठांना बजावले समन्स)
‘या’ भागांना होणार पाणीपुरवठा (Water Cut)
एम पूर्व विभाग : रिफायनरी आउटलेट क्षेत्रं – HPCL, मेसर्स वरुण बेव्हरेजेस लिमिटेड, मेसर्स BARC, HPCL कॉलनी, BPCL सप्लाय, गव्हाणपाडा, RCF कॉलनी, जुना भारत नगर, हशू अडवाणी नगर, नवीन भारत नगर, रॉकलाईन इमारती आणि जे प्लॉट इमारती, सह्याद्रीनगर, ओम-गणेश नगर, राहुल नगर, अशोक नगर या सर्व भागांमध्ये आज पाणीपुरवठा (Water Cut) पूर्णपणे बंद राहील.
एम पश्चिम विभाग : मरवली चर्च, म्हैसूर कॉलनी, वाशी गाव, माहुल, अंबा पाडा, जिजामाता नगर, साई लीला, एसआरए बिल्डिंग्स माहुल, फारुख गल्ली, खादी मशीन, शरद नगर, नवजीवन सोसायटी, कलेक्टर कॉलनी, सिंधी कॅम्प, एम एस बिल्डिंग्स, रामटेकडी, तोलाराम कॅम्प, चेंबूर टॉवर, चेंबूर, चेंबूर टॉवर. नगर एसआरए, कोकणे नगर, मैत्री पार्क, युनियन पार्क, चरई व्हिलेज, गोल्ड क्लब, सी जी रोड, आर सी मार्ग, लाल डोंगर, म्हाडा कॉलनी, आरसीएफ लिमिटेड, चेंबूर गावठाण, घाटला, सुभाष नगर, सिद्धार्थ कॉलनी, मैत्री पार्क, एन जी आचार्य मार्ग, विजय पार्क, कॉर्पोरेट चर्च, डॉ. गार्डन परिसर, चेंबूर स्टेशन रोड, डब्ल्यू टी पाटील मार्ग, खारदेव नगर, एन. बी. पाटील मार्ग बीपीसीएल, बीपीटी, इंडियन ऑइल, एजिस केमिकल या भागात पाणीपुरवठा (Water Cut) बंद राहणार आहे.
Join Our WhatsApp Community


