BMC : पश्चिम उपनगरातील ‘या’ भागात रविवारी पाण्याचा वापर जपून करा; नाहीतर…

जलवाहिनी जोडणीच्या या कालावधीत सोमवारी ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

188
के/पूर्व विभाग येथील महाकाली गुंफ़ा मार्गावरील ‘रम्य जीवन सोसायटी’ जवळ तसेच कार्डिनल ग्रेसीयस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व)’  येथे नवीन १५०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी  आणि १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) जोडण्याचे काम सोमवारी ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजता हाती घेण्यात आले आहे. हे काम त्याच दिवशी मध्यरात्री १२ वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कालावधीत विलेपार्ले ते जोगेश्वरी या महापालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा १६ तास बंद राहणार आहे. तर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती जल अभियंता विभागाने दिली आहे. त्यामुळे या भागातील जनतेला रविवारीच पाण्याचा वापर जपून कारवा लागणार असून नाहीतर पाणी कपातीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
जलवाहिनी जोडणीच्या या कालावधीत सोमवारी ५ जून २०२३ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) या विभागातील  पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या कालावधीत पाणी कपातीपूर्वी आदल्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती  महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

विलेपार्ले ते जोगेश्वरीत पाणी पुरवठ्यावर परिणाम होणा-या त्या विभागांची नावे

  • त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद)
  • सारीपुत नगर, दुर्गा नगर, जोगेश्वरी (पूर्व) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद)
  • विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले रोड, साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान रोड, श्रद्धानंद रोड, नेहरू रोड, तेजपाल रोड, शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, विले-पार्ले पूर्व तसेच विले-पार्ले पूर्व डोमेस्टिक एयरपोर्ट, अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, अंधेरी पूर्व (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद)
  • मोगरपाडा, नवीन नागरदास रोड, जुना नागरदास रोड, अंधेरी (पूर्व) – (पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).
  • मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व) – (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.