Mumbai Water Cut : मुंबईत पाण्याचा दुष्काळ? उद्योग आणि हॉटेल्सचा पुरवठा ‘इतक्या’ टक्क्यांनी घटवला

94
Water Shortage
Water Shortage

पाऊस लांबल्यामुळे मुंबई शहरावर पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने व्यावसायिक, औद्योगिक तसेच क्रीडा संकुलांच्या पाणीपुरवठ्यात तब्बल २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात मुख्य धरणांमधील पाणीसाठा आता केवळ १०.३५ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. जून महिन्यातील कडक ऊन आणि मान्सून (Mansoon) लांबल्यामुळे जलसाठ्यांमध्ये झपाट्याने घट होत आहे. म्हणूनच पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले असून यामुळे मुंबईतील उद्योगांना आता पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे. (Mumbai Water Cut)

(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : क्रिस्टियानो रोनाल्डोकडून निराशा, डीआर काँगोने पोर्तुगालला १-१ ने बरोबरीत रोखले)

बांधकाम आणि जलतरण तलावांचा पाणीपुरवठा बंद
मुंबई महानगरपालिकेने (BMC) घेतलेल्या नव्या निर्णयानुसार, शहरातील सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांचा आणि व्यावसायिक जलतरण तलावांचा पाणीपुरवठा तातडीने थांबवण्यात आला आहे. याशिवाय, नवीन बांधकामांसाठी दिल्या जाणाऱ्या पाणी जोडणीच्या मंजुरीलाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. शीतपेये आणि बाटलीबंद पाणी तयार करणाऱ्या कारखान्यांना केवळ तेथील कामगारांच्या पिण्याच्या गरजेपुरतेच पाणी दिले जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. पुरेसा पाऊस पडून धरणांमधील साठा पूर्ववत होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. (Mumbai Water Cut)

(हेही वाचा – ICC Women’s T20 World Cup 2026 : महिला टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा विजय)

सांडपाणी पुनर्वापर आणि पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचे आदेश
मुंबईत १५ मे पासून आधीच १० टक्के पाणीकपात लागू आहे, मात्र परिस्थिती अधिक गंभीर झाल्याने पालिकेने रेल्वे, नौदल आणि मोठ्या उद्योगांना औद्योगिक कामांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बंधनकारक केला आहे. सर्व संस्था आणि नागरिकांनी वाहने धुणे, बागकाम किंवा रस्ते स्वच्छतेसाठी विहिरी आणि टँकरच्या पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर करणाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.