
-
प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठातील (Mumbai University) अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
(हेही वाचा – पंतप्रधान मोदींचे विदेशी दौरे खुपतात, पण Dr. Manmohan Singh यांनी केलेल्या ७३ विदेशी दौऱ्यांचे काय? किती होती फलनिष्पत्ती?)
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांसाठी १५० दिवसांच्या उद्दिष्टांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. या अंतर्गत आकृतीबंध अद्ययावत करणे, नियुक्ती नियम सुधारित करणे आणि अनुकंपा तत्वावरील भरती १०० टक्के करण्यावर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील (Mumbai University) अनुकंपा तत्वावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित नियुक्त्यांचा आढावा घेऊन त्या संदर्भात कालबद्ध नियोजनानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Tansa Lake : मोडक सागर पाठोपाठ तानसा तलावाने ओलांडली पाण्याची पातळी)
तसेच, सध्या रिक्त असलेल्या अनुकंपाच्या जागांचा पुन्हा आढावा घेऊन तातडीने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील अशा सर्व रिक्त जागा १०० टक्के भराव्यात, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी बैठकीत दिले. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
