Mumbai Suburban : कोळी बांधवांसाठी नुकसान भरपाईत महापालिकेच्या निकषांना प्राधान्य; पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

228
Mumbai Suburban : कोळी बांधवांसाठी नुकसान भरपाईत महापालिकेच्या निकषांना प्राधान्य; पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
Mumbai Suburban : कोळी बांधवांसाठी नुकसान भरपाईत महापालिकेच्या निकषांना प्राधान्य; पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

वांद्रे वर्सोवा सागरी सेतू(Bandra–Worli Sea Link) आणि कोस्टल रोडमुळे(Coastal Road) कोळी बांधवांना होणाऱ्या मासेमारीच्या नुकसानाबाबत उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी आज ठोस निर्देश दिले. मुंबई महापालिकेच्या(BMC) निकषांनुसार नुकसान भरपाई देणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रशासनाला स्पष्ट केले. (Mumbai Suburban)

कोस्टल रोडच्या(Coastal Road) टप्प्यामुळे आणि वर्सोवा ते भाईंदरपर्यंतच्या क्षेत्रातील कोळी बांधवांचे मासेमारीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या निकषांनुसार कमी नुकसान भरपाई मिळत असल्याने कोळी बांधवांनी त्याबाबत तक्रार केली होती. यावर उपनगर पालकमंत्र्यांनी आज मुंबई मेरीटाईम बोर्ड, एमएसआरडीसी, एमएमआरडीए आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली आणि महापालिकेच्या निकषांचा समावेश करुन शासनाच्या अध्यादेशामध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले. (Mumbai Suburban)

(हेही वाचा – BMC School : शिक्षण पद्धतीतील उपक्रमांनी भारावून गेले टांझानियाचे शिष्टमंडळ, अशी दर्शवली तयारी)

शेलार यांनी निर्देशित केले की, वरळी सागर सेतूमुळे बाधित कोळी बांधवांना पूर्वी मिळाल्याप्रमाणेच योग्य भरपाई मिळावी आणि भविष्यातील नुकसान भरपाईतही महापालिकेच्या(BMC) निकषांचा आधार घेतला जावा. यामुळे कोळी बांधवांचा हक्क व सुरक्षा सुनिश्चित होईल, तसेच मासेमारीवर अवलंबून असलेल्या लोकांचे जीवनमान राखले जाईल. (Mumbai Suburban)

मंत्री आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी यावेळी स्पष्ट केले की, शासनाचे निकष आणि महापालिकेच्या निकषांमध्ये असलेले अंतर दूर करणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून नुकसान भरपाईसाठी निश्चित प्रक्रिया राबवावी, अशी ताकीद त्यांनी केली. या बैठकीनंतर कोळी बांधवांना मुंबई महापालिकेच्या निकषानुसार नुकसान भरपाई मिळेल, ही माहिती या निर्णयातून स्पष्ट झाली आहे. (Mumbai Suburban)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.