Mumbai Road Cement Concreting : दक्षिण मुंबईतील ‘ते’ कंत्राट रद्द

मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजित ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांसाठी पाच भागात विभागून काढलेल्या निविदेतील शहर भागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्रादाराने कामाला अद्याप सुरुवात न केल्याने अखेर या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.

119
Mumbai Road Cement Concreting : दक्षिण मुंबईतील 'ते' कंत्राट रद्द
Mumbai Road Cement Concreting : दक्षिण मुंबईतील 'ते' कंत्राट रद्द

मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजित ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांसाठी पाच भागात विभागून काढलेल्या निविदेतील शहर भागासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराने कामाला अद्याप सुरुवात न केल्याने अखेर या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या संबंधित कंत्राटदारावर महापालिका प्रशासन आता काय कारवाई करते आणि या भागातील रस्त्यांच्या कामासाठी कोण कंत्राटदार तयार होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Mumbai Road Cement Concreting)

महानगरपालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामासाठी पश्चिम उपनगरांमधील ५१६ रस्ते, शहरांमधील २१२ रस्ते आणि ८५ तुटलेले सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भाग तसेच पूर्व उपनगरांमधील १८२ रस्त्यांचा समावेश आहे. या पाचही कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या सर्व ३९७ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी विविध करांसह सुमारे ८३१९ कोटी रुपये खर्च होणार आहे. (Mumbai Road Cement Concreting)

यामध्ये शहर भागांच्या रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांसाठी रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. परंतु कार्यादेश दिल्यापासून या कंपनीने काम न केल्याने अखेर या कामाचे कंत्राट रद्द करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी या रस्त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले असून लवकरच शॉर्ट नोटिसवर निविदा मागवून त्वरित पात्र ठरणाऱ्या कंत्राटदारांची निवड करून कार्यादेश देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे कुलाब्यातील माजी नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, माझ्या तक्रारींवर अखेर महापालिकेने कारवाई केली असून दक्षिण मुंबईतील रस्त्यांची कामे करण्यास नकार देणाऱ्या मेसर्स रोडवे सोल्यूशन इंडिया इंफ्रा लिमिटेड. (M/s Roadway Solutions India Infra Ltd) या कंपनीचे कंत्राट रद्द केले. (Mumbai Road Cement Concreting)

(हेही वाचा – Piyush Goyal to Meet Elon Musk : टेस्ला कार भारतात आणण्याच्या हालचालींना वेग, पीयूष गोयल घेणार एलॉन मस्क यांची भेट)

सोमवारी महापालिकेला लिहिलेल्या माझ्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, महापालिकेने या कंत्राटदाराला केवळ मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले पाहिजे. पालिकेने कंत्राटदाराकडून ५२ कोटी रुपयांची दंडाची रक्कम तातडीने वसूल करण्यास सुरुवात करावी. तसेच महापालिकेने कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल करावा आणि कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी चौकशी सुरू करावी, अशीही मागणी ऍड मकरंद नार्वेकर यांनी केली. (Mumbai Road Cement Concreting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.