Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग

141
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग

रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली. बसने पेट घेतल्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मुंबईहून सोलापूरकडे निघाली होती. या बसमध्ये ४२ प्रवासी होते. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ही बस जात होती. बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, संपूर्ण बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

(हेही वाचा – Volkswagen Taigun 1.0 TSI AT GT Line : फोक्सवॅगन टायगनचा ‘हा’ किफायतशीर पर्याय)

अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था, डेल्टा फोर्सने घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांचा जीव वाचवला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.