Malegaon Bomb Blast Case: साध्वी प्रज्ञासिंग यांना २५ एप्रिलला सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

103
Malegaon Bomb Blast Case: साध्वी प्रज्ञासिंग यांना २५ एप्रिलला सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश

२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील (Malegaon Bomb Blast Case) आरोपी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना २५ एप्रिलला न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश विशेष एनआयए न्यायालयाने शनिवारी, (२० एप्रिल) दिले.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह एकूण १३ आरोपींपैकी ५ आरोपींची सुटका झाली असून प्रज्ञासिंग व इतर सहा जणांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) व भारतीय दंड संहितेच्या तरतुदींखाली खटला चालवला जात आहे. (Malegaon Bomb Blast Case)

(हेही वाचा – Volkswagen Taigun 1.5 TSI GT Plus Sport : फोक्सवॅगन कंपनी भारतात घेऊन येतेय टायगन एसयुव्हीचे दोन नवीन व्हेरियंट )

विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या समोर शनिवारी, (२० एप्रिल) या खटल्यावर सुनावणी होती. त्यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वकिलांनी प्रज्ञासिंग यांच्या आजारपणाचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करून एक दिवस सुनावणीला अनुपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारत प्रज्ञा सिंह ठाकूर यांना २५ एप्रिलला सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. (Malegaon Bomb Blast Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.