Kunwar Sarvesh Singh: भाजप उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन, कँन्सरची झुंज ठरली अपयशी

120
Kunwar Sarvesh Singh: भाजप उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन, कँन्सरची झुंज ठरली अपयशी
Kunwar Sarvesh Singh: भाजप उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन, कँन्सरची झुंज ठरली अपयशी

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह (Kunwar Sarvesh Singh) यांचं निधन झालं आहे. त्यांनी शनिवारी (२० एप्रिल) संध्याकाळी ६.३० वाजता दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. त्यांना कँन्सर झाला होता. या आजाराशी झुंज देत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे १९ एप्रिल रोजी मुरादाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. कुंवर सर्वेश सिंह यांना भाजपने तिकीट दिलं होतं. त्यानंतर कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन झाल्याने मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Kunwar Sarvesh Singh)

विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून

मुरादाबादमध्ये ६० टक्के मतदान झालं होतं. तर २०१९ मध्ये या मतदारसंघात ६५.३९ टक्के मतदान झालं होतं. कुंवर सर्वेश सिंह हे व्यवसायाने उद्योजक आहेत. २०१४ मध्ये ते मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. (Kunwar Sarvesh Singh) खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते. २०१४ मध्ये कांठ विधानसभा मतदारसंघात झालेल्या लाऊडस्पीकर वादात सर्वेश यांची मोठी चर्चा झाली होती. या वादात ते असल्याने त्यांच्यावर आरोपप्रत्यारोप झाले होते. (Kunwar Sarvesh Singh)

राजकीय प्रवास कसा ?

सर्वेश सिंह (Kunwar Sarvesh Singh) यांनी पहिल्यांदा १९९१ मध्ये भाजपच्या तिकीटावर ठाकुरद्वारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर सलग चारवेळा ते विजयी झाले. सर्वेश सिंह १९९१ नंतर १९९३, १९९६ आणि २००२ मध्ये सातत्याने निवडणूक जिंकले. मात्र, २००७ मध्ये त्यांना बसपा उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. सर्वेश सिंह (Kunwar Sarvesh Singh) यांचा मुलगा सुशांत सिंह हा बिजनौरच्या बढापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहे. सर्वेश सिंह (Kunwar Sarvesh Singh) यांना भाजपने चौथ्यांदा मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. यापूर्वी २००९ मध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांचा सामना समाजवादी पार्टीच्या डॉ. एसटी हसन यांच्याशी झाला. या निवडणुकीत सर्वेश सिंह (Kunwar Sarvesh Singh) विजयी झाले होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी लढत दिली होती. पण त्यावेळी त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. (Kunwar Sarvesh Singh)

हे पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.