Mumbai Police: रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांचे ‘हे’ नवे ट्विट सोशल मिडियावर ट्रेंड

133
Mumbai Police: रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांचे 'हे' नवे ट्विट सोशल मिडियावर ट्रेंड
Mumbai Police: रस्ते वाहतूक सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांचे 'हे' नवे ट्विट सोशल मिडियावर ट्रेंड

मुंबई पोलीस (Mumbai Police) लोकांना जागरुक करण्यासाठी सोशल मिडियावर सक्रीय असते. मीम्स, व्हिडियो आणि चित्रपटातील गाणी, डायलॉग्जचा वापरही ते यासाठी करत असतात. नागरिकांना जागरुक करण्यासाठी त्यांनी वापरलेली ही क्रिएटिव्ह स्टाईलमध्ये त्यांनी केलेले ट्विट लोकांनाही आवडते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अशीच वापरलेली शक्कल लोकांना आवडली आहे.

मुंबई पोलिसांची (Mumbai Police) सायबर टीम सोशल मिडियावर सक्रीय असते. त्यांनी तयार केलेल्या क्रिएटिव्ह पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. सध्या इन्स्टाग्रामवर ‘कॅज्युअल है’ हे मीम मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनीही (Mumbai Police) रस्ते वाहतूक सुरक्ष टिप्स शेअर करण्यासाठी या मीमचा वापर केला आहे.

(हेही वाचा – Milind Deora : मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, अद्याप माहित नाही, पण…)

मंबई पोलीस आणि सीपी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ३ वेगवेगळ्या स्लाइड्स आहेत. तिन्ही स्लाइडसद्वारे रस्ता सुरक्षा टिप्स देण्यात आल्या आहेत. पहिल्या स्लाइड्समध्ये आई, बाबा आणि दोन मुली बाईकवर बसलेल्या दिसत आहेत, तर त्याच्या खाली हाफ विंडोमध्ये ट्रेंडिंग कॅज्युअल है मीम दिसत आहे. पुढील स्लाइडमध्ये एक व्यक्ती मोबाईल फोनकडे पाहत कार चालवताना दिसत आहे. तिसऱ्या स्लाइडमध्ये कार १४०च्या वेगाने पळताना दाखवली आहे. पहिल्या स्लाइडप्रमाणेच उर्वरित दोन स्लाइड्सवरही लिहिले आहे की, ‘सेफ्टीची ही पद्धत केवळ कॅज्युअलच नाही, तर धोकादायकही आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.