Milind Deora : मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, अद्याप माहित नाही, पण…

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते.

166
Milind Deora : मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, अद्याप माहित नाही, पण...
Milind Deora : मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, अद्याप माहित नाही, पण...

कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी रविवारी (14 जानेवारी) सकाळी कॉंग्रेसला राजीनामा दिला. त्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना प्रश्न विचारला आहे.

माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘ मिलिंद देवरा (Milind Deora) यांचा पक्ष प्रवेश होत आहे, असे मी ऐकतोय. अद्याप मला माहित नाही, पण ते पक्षप्रवेश करणार असतील, तर त्यांचे मी स्वागत करतो.’

(हेही वाचा – Congress Party: कॉंग्रेसला एका दिवसात दोन धक्के, मिलिंद देवरांनंतर ‘या’नेत्यानेही दिला राजीनामा)

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आले होते. रामदास कदम यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे मुख्यमंत्री या भेटीबाबत बोलले. यावेळी माध्यमांनी त्यांना विविध प्रश्न विचारून बोलते केले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.