Mumbai New Jail : ‘नेट्राम’ तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग; घाटकोपर-मानखुर्दमध्ये १,२०० झोपड्या जमीनदोस्त, मुंबईला मिळणार नवे हायटेक कारागृह

206
Mumbai officials signing agreement for new high-tech jail project.
Mumbai New Jail : 'नेट्राम' तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग; घाटकोपर-मानखुर्दमध्ये १,२०० झोपड्या जमीनदोस्त, मुंबईला मिळणार नवे हायटेक कारागृह
  • प्रतिनिधी 

Mumbai New Jail               मुंबईतील आर्थर रोड आणि अन्य कारागृहांवरील कैद्यांचा वाढता ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडनजीकची ११ एकर महसुली जमीन अखेर शुक्रवारी केंद्रीय कारागृह प्राधिकरणाकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जमिनीचा हस्तांतरण सोहळा पार पडला. या नव्या कारागृह संकुलाच्या बांधकामामुळे मुंबईतील सध्याच्या कारागृहांवरील सुरक्षेचा आणि गर्दीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल. “या महत्त्वाच्या निर्णयामुळे मुंबईच्या अंतर्गत सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्थापनाला मोठा बळ मिळेल,” असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. (Mumbai New Jail)

(हेही वाचा – Kalyan Crime : पालक की गुन्हेगारीचे प्राध्यापक? पोटच्या मुलांना घरफोडीचे प्रशिक्षण देणारी टोळी गजाआड)

हायटेक ‘नेट्राम’चा दणका; एकाच दिवसात १,२०० झोपड्या जमीनदोस्त

या संपूर्ण मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अतिक्रमण हटवण्यासाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान. झोपडपट्ट्यांनी व्यापलेला हा विस्तीर्ण भूखंड गेल्या महिन्यात (एप्रिल) अवघ्या एका दिवसात झोपड्यांपासून पूर्णपणे मोकळा करण्यात आला. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) सन २००० सालापासून उपग्रहांच्या (सॅटेलाईट) साहाय्याने या परिसरातील झोपडपट्ट्यांचा डिजिटल नकाशा तयार केला होता. यासाठी नेटवर्क For एन्क्रोचमेंट ट्रॅकिंग अँड रिपोर्टिंग फॉर मुंबई’ (NETRAM – नेट्राम) या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात आला. अशा हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिक्रमणमुक्त करण्यात आलेला हा मुंबईतील पहिलाच भूखंड ठरला आहे. या मोहिमेत २०११ नंतर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या जवळपास १,२०० झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी एस. कटियार यांनी दिली. (Mumbai New Jail)

(हेही वाचा – HIV Treatment Dropouts : ६११ एचआयव्ही बाधित रुग्णांनी अर्ध्यावरच सोडले उपचार; यामागे नेमकं कारण काय?)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट निर्देश

गृहखात्याची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या कारागृहाच्या बांधकामासाठी तातडीने ११ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी (अपील आणि सुरक्षा) मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून जमिनीची मागणी केली होती. त्यानंतर ‘नेट्राम’च्या साहाय्याने २०११ नंतरची अतिक्रमणे अचूक शोधून ही धडक कारवाई करण्यात आली. मुंबईतील कारागृहांची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे. आर्थर रोड कारागृह क्षमता ८०४ कैदी आहे, परंतु सध्या असलेले प्रत्यक्ष कैदी १,८१४ कैदी (क्षमतेपेक्षा दुप्पट) आहेत. (Mumbai New Jail)

यापूर्वी २०१७ मध्ये राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला कळवले होते की, आर्थर रोड आणि तुर्भे कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी मानखुर्द जिल्ह्यातील मांडळे येथे १६ हेक्टर जागा राखून ठेवण्यात आली आहे. तसेच, २०२० मध्ये कारागृह विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) मानखुर्द येथील ५ एकर भूखंडावर १०,००० कैद्यांची क्षमता असलेले २५ मजली बहुमजली कारागृह उभारण्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यादृष्टीने हे जमीन हस्तांतरण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. २०१५ पासून राज्य सरकारने राज्यातील कारागृहांची क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे. महाराष्ट्रातील एकूण ६० कारागृहांपैकी, २०१५ नंतर तळोजा, सिंधुदुर्ग, जालना, नंदुरबार, वाशिम आणि गडचिरोली अशा ६ ठिकाणी नवीन अत्याधुनिक कारागृहे उभारण्यात आली आहेत. आता या यादीत मुंबईतील मानखुर्दच्या आधुनिक कारागृहाची भर पडणार आहे. (Mumbai New Jail)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.