Mumbai Metro Phase 1 : मेट्रोतील गर्दीतून मुंबईकरांना मिळणार दिलासा ?; काय आहेत प्रस्ताव…

Mumbai Metro Phase 1 : एमएमआरडीए चालवत असलेल्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन मार्गिका अत्याधुनिक आहेत. त्यामुळेच मेट्रो १ च्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी काय करता येईल, याचा अभ्यास केला जात आहे.

147
Mumbai Metro Phase 1 : मेट्रोतील गर्दीतून मुंबईकरांना मिळणार दिलासा ?; काय आहेत प्रस्ताव...
Mumbai Metro Phase 1 : मेट्रोतील गर्दीतून मुंबईकरांना मिळणार दिलासा ?; काय आहेत प्रस्ताव...

घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो मार्गिका १ रिलायन्स इन्फ्राकडून ४ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. ‘एमएमआरडीए’ने (MMRDA) सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. या सुधारणा झाल्यास मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. (Mumbai Metro Phase 1) काय आहेत या सुधारणा –

  • या मार्गिकेवरील सिग्नल यंत्रणा, रूळ यांमध्ये अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करणार
  • प्रवाशांसाठी अधिक संख्या असलेल्या गाड्या चालवणार
  • जुने डबेही बदलले जाण्याची शक्यता आहे
  • मेट्रोच्या फेऱ्या वाढवणार

(हेही वाचा – Republic Party : रिपब्लिकन पक्षाची पुण्यात राज्यस्तरीय बैठक; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार)

४ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याला मंत्रीमंडळाची मान्यता

मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या मेट्रो १ चे संचालन रिलायन्स इन्फ्रा (अनिल धीरूभाई अंबानी समूह) कंपनीच्या मक्तेदारीतील मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) या संयुक्त कंपनीकडून होते. त्यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (MMRDA) हे २६ टक्क्यांचे भागीदार आहेत. ही कंपनी सातत्याने तोट्यात असतांना एमएमआरडीएने ही कंपनी ४ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याला मंत्रीमंडळाने विशेष अभ्यास समितीच्या अहवालाच्या आधारे मंजुरी दिली आहे.

पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी उपाययोजना

मेट्रो १ ची मार्गिका खरेदी करण्यासाठी वित्तीय तयारी सुरु होण्यास अद्याप अवकाश आहे. मात्र मार्गिका ताब्यात आल्यानंतर काय-काय करता येईल, प्रवाशांच्या दृष्टीने काय करायला हवे, आदींबाबत अभ्यास सुरु झाला आहे.’प्रवासाचे सुलभीकरण’ हा त्या आराखड्याचा केंद्रबिंदू असेल. या मार्गिकेतील डबे जुने आहेत. तंत्रज्ञानही जुने आहे. या मार्गिकेच्या तुलनेत एमएमआरडीए चालवत असलेल्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन मार्गिका अत्याधुनिक आहेत. त्यामुळेच मेट्रो १ च्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी काय करता येईल, याचा अभ्यास केला जात आहे.

सहा डब्यांच्या गाड्या चालवण्याचा विचार

या मेट्रो मार्गिकेवर सध्या दररोज चार डब्यांच्या ४०८ फेऱ्या चालविल्या जात आहेत. त्याद्वारे दररोज ४.८० लाख प्रवासी ये-जा करतात. मात्र ही मेट्रो मार्गिका २०१४ मध्ये सुरु होण्याआधी करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, २०२१ मध्येच ६.६५ लाख प्रवासी या मेट्रोचा वापर करतील, असा अंदाज बांधला जात होता. कंपनीने फेऱ्या वाढवल्यास किंवा सहा डब्यांच्या गाड्या चालविल्यास अधिक प्रवासी या मेट्रोचा वापर करू शकतील.

फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न

ही मार्गिका सुरु होण्याआधी एमएमआरडीएसह झालेल्या करारात गर्दीच्या वेळी (सकाळी ५ तास आणि सायंकाळी ५ तास) सहा किंवा आठ डब्यांच्या गाड्या चालवल्या जाव्यात, असे नमूद आहे. तसे असताना कंपनी खर्च टाळण्यासाठी सध्या फक्त ४ डब्यांच्याच गाड्या चालवत आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या व अर्ध्या तासाहून अधिक वेळेची बचत करणाऱ्या या मेट्रो सेवेचा मुंबईकर पूर्ण क्षमतेने उपयोग करू शकत नसल्याचे चित्र सध्या आहे. मार्गिका ताब्यात आल्यानंतर किमान सहा डब्यांची गाडी चालविण्यासह फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असेल. (Mumbai Metro Phase 1)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.