Mumbai Metro ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना राखीव सीट वाढवल्या, एमएमआरडीएचा निर्णय

मेट्रोतून दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

519
Mumbai Metro ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना राखीव सीट वाढवल्या, एमएमआरडीएचा निर्णय
Mumbai Metro ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना राखीव सीट वाढवल्या, एमएमआरडीएचा निर्णय

मेट्रोची (Mumbai Metro) दैनंदिन प्रवासी संख्या ३ लाखांपर्यंत पोहोचल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागतो. यामुळे गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता मेट्रोने महत्त्वाची उपाययोजना केली आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी असलेली राखीव सीट वाढवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे आता मेट्रोतून दाटीवाटीने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

(हेही वाचा – BJP Maharashtra Politics : काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी, राजेंद्र नरवणकर हे भाजपच्या गळाला )

एमएमआरडीएकडून अंधेरी-गुदवलीदरम्यान ६ डब्यांच्या २२ मेट्रो ट्रेन चालवल्या जातात. वाहतूक कोंडीशिवाय गारेगार प्रवास करता येत असल्याने प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, माहिला प्रवासी आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, मात्र सध्या ६ डब्यांच्या गाडीत एक डबा महिलांसाठी राखीव आहे, तर उर्वरित ५ डब्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव सीट असल्या तरी त्या अपुऱ्या ठरत आहेत. त्यामुळे अनेकदा वयस्क प्रवाशांना बसण्यासाठी जागा न मिळाल्याने उभे राहूनच प्रवास करावा लागतो. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नुकताच मेट्रो ट्रेनने प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांची गैरसोय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ज्येष्ठांसाठी राखीव सीट वाढवण्याचा आणि गर्भवती महिलांसाठी राखीव सीट ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.