BJP Maharashtra Politics : काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी, राजेंद्र नरवणकर हे भाजपच्या गळाला

काँग्रेसचे वांद्रे पश्चिममधील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केल्यानंतर मरोळमधील माजी नगरसेवक जगदीश अमिन कुट्टी आणि कामाठी पुरा परिसरातील माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

1176
BJP Maharashtra Politics : काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी, राजेंद्र नरवणकर हे भाजपच्या गळाला

मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पक्षांतील आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत असतानाच आता भाजपमध्येही भरती सुरु झाली आहे. काँग्रेसचे वांद्रे पश्चिममधील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केल्यानंतर मरोळमधील माजी नगरसेवक जगदीश अमिन कुट्टी आणि कामाठी पुरा परिसरातील माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ज्यांच्या मतदार संघात भाजपला अनुकूल वातावरण आहे आणि जे स्वत:च्या दमावर निवडून येऊ शकतात, अशा काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना भाजपने आपल्या गळाला लावले आहे. (BJP Maharashtra Politics)

मुंबईतील प्रभाग क्रमांक ८२चे सलग दोन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी नगरसेवक जगदीश अमिन कुट्टी आणि दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक २१६चे काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड. आशिष शेलार यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी, प्रसाद लाड, भालचंद्र शिरसाट, अमरजीत मिश्र आदी यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत हा प्रवेश झाला. याप्रसंगी सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे दोखो होता है क्या… असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. दरम्यान, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे असे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. (BJP Maharashtra Politics)

(हेही वाचा – Sai Resort Dapoli : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा; 11 महिन्यानंतर होणार सुटका)

यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे कुट्टी यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

माजी नगरसेवक जगदीश अमिन कुट्टी हे एकेकाळचे भाजपा नेते व मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जायचे. राणे यांच्यासोबत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, परंतु राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही कुट्टी हे काँग्रेसमध्येच राहिले होते. शिवसेनेचे तत्कालिन नगरसेवक सुभाष कांता सावंत हे जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यानंतर त्यांच्या जागी प्रथम जगदीश अमिन कुट्टी हे नगरसेवक म्हणून निवड झाली होती, त्यानंतर सन २०१७च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. पण आता सुभाष कांता सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला असून कुट्टी यांनी यामुळेच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. (BJP Maharashtra Politics)

तर प्रभाग क्रमांक २१६चे नगरसेवक राजेंद्र नरवणकर हे महापालिकेचे अभियंते असून सन २०१७च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. परंतु काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यांचा पक्षात वाली नसल्याने अमिन पटेल यांच्या अधिपत्याखाली तिथे राहणे शक्य नसल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये त्यांना चांगल्याप्रकारचे वर्तणूक मिळत नव्हती, त्यामुळे आधीपासूनच ते नाराज होते. महापालिकेचे अभियंते असल्याने त्यांनी नगरसेवक म्हणून विभागात चांगल्याप्रकारे काम करून घेतली. त्यामुळे एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची महापालिकेत तसेच विभागात ओळख आहे. (BJP Maharashtra Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.