Sai Resort Dapoli : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा; 11 महिन्यानंतर होणार सुटका

Sai Resort Dapoli : भाजप नेते सोमय्या यांनी उबाठा गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. या वेळी अनिल परब यांनी हे आरोप फेटाळून लावले, तसेच माझा साई रिसॉर्टशी संबंध नाही, हे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.

123
Sai Resort Dapoli : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा; 11 महिन्यानंतर होणार सुटका
Sai Resort Dapoli : अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दिलासा; 11 महिन्यानंतर होणार सुटका

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Dapoli) अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 11 महिन्यांपूर्वी ईडीने त्यांना अटक केली होती. सदानंद कदम हे उबाठा गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय आहेत.

(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही; काय म्हणाले हरिभाऊ राठोड)

आमदार अनिल परब यांच्यावर आरोप

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तक्रार केली होती. बेकायदेशीर बांधकाम आणि जमिनीच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराचा ठपका ठेऊन सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती.

या प्रकरणी सोमय्या यांनी उबाठा गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. या वेळी अनिल परब यांनी हे आरोप फेटाळून लावले, तसेच माझा साई रिसॉर्टशी संबंध नाही, हे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती. देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे.

सीआरझेड कायद्याचे उल्लंघन

रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावच्या किनाऱ्यावर ‘साई रिसॉर्ट’ उभारण्यात आले आहे. हे रिसॉर्ट उभारतांना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले आहे. मनी लाँड्रिंगचाही प्रकार झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या वेळी सदानंद कदम यांनी रिसॉर्टची मालकी परब यांची नसून माझी आहे. राजकारणात मला त्रास दिला जात आहे, असा दावा केला होता. तसेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वेळी न्यायालयाने अनिल परब यांना अटकेपासून संरक्षण दिले, तर सदानंद कदम यांना आता जामीन दिला आहे. (Sai Resort Dapoli)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.