MUMBAI: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, अनेक लोकल रद्द; पाहा वेळापत्रक

76
MUMBAI: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, अनेक लोकल रद्द; पाहा वेळापत्रक
MUMBAI: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, अनेक लोकल रद्द; पाहा वेळापत्रक

MUMBAI: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल तसेच अन्य अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी (ता. २) मध्य रेल्वेकडून मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील जलद लोकल सेवा धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. तर हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द होणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे 

कुठे – माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी – सकाळी ११.५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल गाड्या माटुंगा येथून डाऊन थीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यानच्या सर्व निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि अंतिम स्थानकावर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्या मुलुंड येथून पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. तसेच ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगादरम्यानच्या सर्व निर्धारित स्थानकांवर थांबून माटुंगा येथून पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हेही वाचा –  Commonwealth Games 2026 : भालाफेक स्पर्धेत भारताची दुहेरी मुसंडी; नीरज चोप्राला रौप्य, यशवीर सिंहला कांस्य पदक

हार्बर मार्ग 

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्ग

कधी – सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम – ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लोकल सेवा रद्द राहतील. तसेच लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर सेवा बंद राहतील. तसेच गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर सेवाही रद्द राहतील. ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे 

कुठे – मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी – शनिवार रविवारी मध्यरात्री १२.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत

परिणाम – या कालावधीत चर्चगेट ते सांताक्रूझदरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. मात्र रविवारी (ता. २) पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसल्याने लोकल सेवा नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.